Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य हे कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी होते. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी सामान्य मुलाला सम्राट अशोक बनवलं. आचार्य चाणक्य लिखित ‘चाणक्य नीति’ या पुस्तकात मानवी समाजाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती चाणक्य नीतिच्या गोष्टी समजून घेतो आणि त्याचा आपल्या जीवनात योग्य वापर करतो, त्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. इथे तुम्हाला चाणक्याच्या धोरणांविषयी माहिती मिळेल, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की कोणत्या गोष्टींमध्ये महिला पुरुषांपेक्षा खूप पुढे असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“स्त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा।
साहसं षड्गुणं चैव कामोष्टगुण उच्यते।।”

आचार्य चाणक्यांचे धोरण सांगतं, ‘स्त्रिया पुरुषांपेक्षा दुप्पट भुकेल्या असतात. कारण महिलांना त्यांच्या शारीरिक स्वरूपानुसार जास्त कॅलरीजची गरज असते. अशा परिस्थितीत पुरुषांपेक्षा महिलांना जास्त भूक लागणे स्वाभाविक आहे.

चाणक्य नीति म्हणते की, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. कुशाग्र बुद्धीमुळे महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यास सक्षम असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा चार पट अधिक बुद्धिमान असतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये शारीरिक ताकद कमी असते, पण धैर्याच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा अजिबात कमी नाहीत. चाणक्य नीतिनुसार महिला पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्यवान असतात. ती तिच्या धैर्याने कोणत्याही गोष्टीला तोंड देऊ शकते.

चाणक्य नीतिनुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा आठ पट जास्त कामुक असतात. चाणक्यांच्या या श्लोकमध्ये स्त्रीयांचं वर्णन ‘कामोष्टगुण’ असं केलंय. म्हणजे कामुकतेच्या बाबतीत स्त्रीया पुरुषांपेक्षा आठपटीने जास्त कामुक असतात. म्हणजे या बाबतीत स्त्रीया पुरुषांपेक्षा बऱ्याच पटीने पुढे असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti women are better then men in these things know what chanakya niti prp