टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा चालू आहे. या कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी नवनवीन प्लॅन आणतात नाहीतर आधीच्याच प्लॅनमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे एयरटेलने आपल्या एका प्लॅनमध्ये बदल केला आहे. हा प्लॅन ४४८ रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनची व्हॅलिडीटी ८२ दिवसांची आहे. याआधी आयडीया आणि व्होडाफोनने आपल्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केला होता. रिलायन्स जिओच्या ४४९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी कंपनीने हा नवीन प्लॅन लाँच केला आहे.
ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा मिळावी यासाठी कंपनी एकाहून एक आकर्षक ऑफर्स आणत आहेत. रिलायन्सही आपल्या ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये सध्या १.५ जीबी हाय स्पीड डेटा देत असून त्याचबरोबर प्रतिदिन १०० एसएमएस आणि कॉलिंग मोफत मिळणार आहे. त्याचप्रमाणे एयरटेलही प्रतिदिन १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये रोमिंगही मोफत मिळणार आहे.
मागच्याच आठवड्यात एअरटेलने १६९ रुपयांची योजना सादर केली होती. या योजनेत ग्राहकांना प्रतिदिन १ जीबी हाय स्पीड डेटा मिळत आहे. या योजनेचा कालावधी २८ दिवस असून, यात मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती.