हृदयरोग होऊ नये असे आपणास वाटत असले तरी न होण्यासाठी आपणच आपले पर्याय शोधले पाहिजे. यावर आळा घालण्यासाठी जीवनशैली बदलली पाहिजे, असे प्रतिपादन सवरेदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले.
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या जागर जाणिवांच्या व आरोग्य समितीच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कार्य, तणाव व हृदयरोग या विषयावर आधारित व्याख्यानमालेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, डॉ. रोहन आईंचवार, प्रा. उषा खंडाळे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. जे. ए. शेख यांनी केले. डॉ. रोहन आईंचवार यांच्या एकंदरीत कार्याचा आढावा घेतला. डॉ. रोहन आईंचवार यांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित नागरिकांना हृदय रोगावर मार्गदर्शन करतांना डॉ. रोहन आईंचवार यांनी हृदयरोगासंबंधी विविध प्रकारच्या संदर्भाचा वापर करतांना स्लाईडच्या माध्यमातून या रोगावर चर्चा केली.
कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. संचालन प्रा. शीतल बोरा यांनी व आभार  प्रा. एस.टी. चिकटे यांनी केले. यासाठी जागर जाणिवांच्या व आरोग्य समितीचे सर्व सदस्य, राजेश इंगोले, गुरूदास शेंडे, प्रशांत मडावी यांनी सहकार्य केले.

Story img Loader