किडनी निरोगी ठेवण्यासाठी योगा व्यतिरिक्त जीवनशैलीत काही बदल करणे देखील आवश्यक आहे, ज्याचा वापर करून तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. घरी शिजवलेले अन्न खा आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा. आपल्या आहारात अधिकाधिक फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. याशिवाय अशा काही सवयी आहेत ज्यांमुळे आपली किडनी खराब होऊ शकते, चला जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) मिठामध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी मीठाशिवाय औषधी वनस्पती किंवा मसाल्यांचा वापर करून अन्न स्वादिष्ट बनवता येते. त्यामुळे जास्त मीठ खाण्याच्या सवयीलाही आळा बसू शकतो.

२) प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा. प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये सोडियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. फॉस्फरसयुक्त पदार्थ खाणे किडनीशी संबंधित आजार असलेल्या लोकांसाठी हानिकारक आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, किडनीचा आजार नसलेल्या लोकांच्या किडनी आणि हाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते कारण प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.

( हे ही वाचा: सकाळी उठून फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; Blood Sugar Level राहील नियंत्रणात)

३) भरपूर पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे किडनीद्वारे विषारी आणि सोडियमयुक्त पदार्थ शरीरातून काढून टाकणे सोपे होते. तसेच भरपूर पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. यासाठी पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे.

४) चांगली झोप आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे किडनीचे आरोग्यही चांगले राहते. झोपेच्या आणि जागरणाच्या वेळेनुसार किडनीचे कार्य निश्चित केले जाते. किडनीचे एकूण कार्य २४ तासांत कसे होईल हे झोपेने ठरवले जाते.

५) मांस खाल्ल्याने रक्तातील आम्लाचे प्रमाण वाढते. परिणामी, ते किडनीसाठी हानिकारक होते. यामुळे अॅसिडोसिसची समस्या वाढते. अर्थात, मूत्रपिंड शरीरातून अतिरिक्त ऍसिड बाहेर काढू शकत नाहीत. शरीराच्या एकूण कार्यासाठी प्रथिनांची गरज असते. ही प्रथिने फळे आणि भाज्यांमधून मिळतात. त्यामुळे किडनी सुरळीतपणे काम करते.

( हे ही वाचा: Uric Acid: रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका; सांधेदुखीची समस्या वेगाने वाढू शकते)

६) जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढू शकते. परिणामी, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ते धोकादायक आहे. मिठाई आणि कोल्ड्रिंक्ससह गोड पदार्थ ही मूत्रपिंड विकारांची दोन प्रमुख कारणे आहेत. तसेच, पांढरा ब्रेड खाणे टाळा. कारण त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.

७) सिगारेटमुळे फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हृदय व मूत्रपिंडावरही याचे गंभीर परिणाम होतात. सिगारेट ओढणाऱ्यांच्या लघवीत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.

८) अल्कोहोल टाळा, दारूचे अतिसेवन हानिकारक आहे. त्यामुळे किडनीचे विकार बळावतात. दारूसोबतच सिगारेट ओढणाऱ्यांना किडनीच्या अनेक धोकादायक समस्यांना सामोरे जावे लागते.

( हे ही वाचा: बदामच नव्हे, तर शेंगदाणे देखील वाढवतात स्मरणशक्ती; फक्त ‘या’ प्रमाणात दररोज सेवन करा)

९) जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणाऱ्या लोकांना किडनीच्या आजाराला सामोरे जावे लागते. एकाच जागी बसून किंवा शरीराची हालचाल केल्याने त्याचा किडनीवर नेमका कोणता परिणाम होतो यावर संशोधक संशोधन करत आहेत.

१०) पेन किलर्सने रोग लवकर बरा होतो, पण त्याचे अतिसेवन किडनीसाठी घातक आहे. किडनीचा आजार असलेल्यांनी पेनकिलर घेणे टाळावे. NSAID चे नियमित सेवन मर्यादित करा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मर्यादित प्रमाणात घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change these 10 habits otherwise your kidney may get damaged anytime gps