आकार बदलणारे नॅनोकण हे डीएनएच्या धाग्याला चिकटवून थेट कर्करोग पेशीत औषध सोडता येते त्यामुळे इतर उपचारांमुळे जसे केस गळणे किंवा त्वचेची हानी होते तसे होत नाही. अनेक कर्करोग औषधे वाढणाऱ्या कर्करोग पेशींवर मारा करतात, ती रक्तात मिसळल्याने वेगाने परिणाम दिसतो. यात कर्करोगाच्या गाठींवर परिणाम होतो तसाच केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होतो. आतडय़ाचा पोत बिघडतो. त्वचेची हानी होते. टोरांटो विद्यापीठाचे वॉरेन चॅन यांच्या मते गेल्या दशकात केमोथेरपीची औषधे कशी द्यावीत यावर मोठे संशोधन झाले आहे. कर्करोगाच्या दोन गाठी कधीच सारख्या नसतात व स्तनाच्या कर्करोगाच्या आधीच्या अवस्थेत उपचारात औषधे वेगवेगळा परिणाम होतो व शेवटच्या अवस्थांमधील कर्करोगातील कर्करोगांच्या गाठीवर वेगळा परिणाम होतो. औषधाचे कुठले कण गाठीच्या आत जाणार हे अनेक घटकांवर अवलंबून असते त्यात कणाचा आकार, पृष्ठीय रासायनिक गुण यांचा संबंध असतो. संशोधकांच्या मते लहान रेणू सोडले तर जास्त परिणाम होतो व दुष्परिणाम होत नाहीत त्यासाठी नॅनोतंत्रज्ञानाचा वापर केला जातो रेणवीय औषध वहन प्रणालीचा वापर यात केला जातो व आकार बदलणारे नॅनोकण वापरून कर्करोगावर उपचार प्रभावी करता येतात त्यात लेगोसेटचा वापर केला जातो. आकार बदलणारे नॅनोकण हे धातूचे बारीक  कण असतात व ते डीएनएच्या धाग्याला जुळतात व ते रक्तात वाईट परिणाम न करता तरंगत असतात. कर्करोगाचा निदर्शक असलेल्या डीएनएला ते चिकटतात. त्यावेळी हे कण आकार बदलून चटकन कर्करोग पेशींवर हल्ला करतात व कर्करोग पेशी ओळखण्याचा संदेश असलेला रेणूही तेथे तयार होतो हे संशोधन पीएनएएस अँड सायन्स नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Story img Loader