अंडे हे प्रथिन्याचे (protein) चांगले स्त्रोत आहे. पेशींच्या रचनेत प्रथिन्यांची महत्वाची भूमिका असते. स्नायूंच्या पेशी आणि विविध रक्तघटक प्रथिन्यांपासून तयार होतात. प्रथिने हाडांना बळकटी देतात. या फायद्यांमुळे अनेक लोक नाश्त्यात अंड्याचे सेवन करतात. अंडा उकळून किंवा त्याचे ऑमलेट बनवून आवडीने ते खाल्ले जाते. हिवाळ्यात तर अंड्यांची मागणी जोर धरते. अशात बाजारात खोट्या अंड्यांची विक्री वाढू शकते. हे अंडे आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्यामुळे, अंडे घेताना ते तपासणे गरजेचे आहे. खोटा आणि खरा अंडा ओळखण्यासाठी पुढील टिप्स फायदेशीर ठरू शकतात.
1) आगीच्या मदतीने तपासा
खोट्या आणि खरा अंडा कोणता हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आगीचा वापर करू शकता. बनावट अंड्याचे कवच हे प्लास्टिकपासून बनवले जाते. त्यामुळे, आगीजवळ असा अंडा नेल्यास अंडा पेटू शकतो. दुसरीकडे खऱ्या अंड्याचे कवच आगीवर ठेवल्यास ते काळे होते. यातून तुम्हाला खऱ्या आणि खोट्या अंड्यातील फरक ओळखता येईल.
(दुसरे बाळ जन्माला घालण्याची योजना आहे? त्या आधी ‘या’ गोष्टी तपासा, पालक्तवाचा प्रवास सोपा होईल)
२) अंड्याला हालवा
अंड्याला हालवून देखील खऱ्या, खोट्याची माहिती मिळू शकते. यासाठी अंड्याला हातात घेऊन त्यास जोराने हालवा. अशात खोट्या अंड्यातून द्रव्य हालत असल्याचा आवाज येईल. तर दुसरीकडे खऱ्या अंड्यातून कुठलाही आवाज येत नाही. त्यामुळे, अंडे खरेदी करताना ते अशा प्रकारे तापसून खरेदी करा.
३) अंड्यातील पिवळे बलक तपासा
खऱ्या आणि खोट्या अंड्यातील बलकामध्ये खूप फरक असतो. खरा अंडा फोडल्यानंतर त्यातील बलक (पिवळा भाग) सामान्य दिसून येते. तर खोट्या अंड्यातील बलकात पांढऱ्या रंगाचा द्रव दिसून येतो. शंका असल्यास अंड्याला फोडून त्यातील बलक तपासा. खरा अंडा असल्याची खात्री झाल्यावरच त्याचे सेवन करा.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)