आपण दररोज अनेक रेसिपीचे इंटरनेटवर व्हिडीओ पाहतच असतो. मस्त जेवणासोबत जोडीला पापड हवाच असं अनेकांचं असत. दक्षिण भारतीय थाळी असो किंवा उत्तर भारतीय पापड हा जेवणात तोंडी लावण्यासाठी असतो. काहींना जेवण करताना पापड हा भाजलेला किंवा तळलेला खायला आवडतो. मात्र या पापडापासून काहीतरी वेगळं बनवण्याकरिता काही दिवसांपूर्वी शेफ सारांश गोयला यांनी एक हटके प्रयोग केला. त्यांनी पापडा पासून पास्ता बनवला आणि त्याचा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा पापडा पासून बनवलेली नवीन रेसिपी शेअर केली आहे. शेफ सारांश गोयला यांनी पापड लजानिया ही नवीन रेसिपी इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या व्हिडीओला लोकांनी जास्त पसंती दिली आहे.  तर या पापडाला इटालियन चव देण्यासाठी काय काय साहित्य वापरले आहे ते बघुयात. चला तर मग पापड लजानियाची रेसिपी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पापड लजानिया कस बनवायचा?

– पापड लजानिया तयार करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही चार ते पाच पापड घ्या आणि हे पापड तुम्ही ६० सेकंद पाण्यात उकळवा. यानंतर हे पापड बर्फाच्या पाण्यात टाका आणि एका ताटामध्ये काढून ठेवा. असे आणखीन पापड तुम्ही तयार करा.

– आता बेकिंग कंटेनरच्या बेसवर एक पापड ठेवा. या पापडावर तुम्ही तुमच्या आवडत्या टॉपिंग्ज, चीज, पास्ता सॉस लावा. असे चार ते पाच पापडांचे एकावर एक लेअर तयार करून हे पापड ओव्हनमध्ये बेक करा. यानंतर खाण्यासाठी  तयार आहे पापड लजानिया.

शेफ सारांश गोयला यांनी बनवलेला पापड लजानियाचा हा व्हिडीओ पहा:

शेफ सारांश गोयला यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताच २४ तासात ९४ हजाराहून अधिक लोकांनी त्यांच्या हा व्हिडीओ पाहिला आहे. तर शंभराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला कमेंट देखील केल्या आहेत. दरम्यान शेफ यांनी पापड लजानिया ही अनोखी रेसिपी शेअर केल्याने त्यांचे फॉलोवरस अक्षरशा: गोंधळून गेले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chef summarizes his quirky experiment see how to make papad lasagna recipe scsm