सतत ‘च्युइंग गम’ चघळल्याने बालकांना आणि तरुणांसुद्धा त्रीव डोकेदुखीच्या (अर्धशिशी) त्रासला सामोरे जावे लागू शकते असे एका अभ्यातून समोर आले आहे.
‘टेल अविव मेडिकल सेंटर’ मधील डॉ. नाथन वॉटेमबर्ग यांच्या दाव्यानुसार, सततच्या च्युइंग गम चघळल्याने बालके आणि तरणसुद्धा अर्धशिशीच्या त्रासाला आमंत्रण देत असतात. च्युइंग गम चघळणे आणि अर्धशिशी यांचा काही परस्परसंबंध आहे का? यावर परिक्षणही केले जाणार आहे. परंतु, वॉटेमबर्ग यांनी अर्धशिशीचा त्रास असलेल्यांची तपासणी केली असता. त्यांच्यापैकी बहुतेक जणांना सतत च्युइंग गम चघळण्याची सवय असल्याचे आढळून आले आहे. इतकेच नाही, तर वॉटेमबर्ग यांनी त्यांना च्युइंग खाणे टाळण्यास सांगितल्यावर त्यातील काही जणांना अर्धशिशीचा त्रास कमी झाल्याचेही जाणवले. यावरून च्युइंग गम जास्त काळ चघळल्याने त्रीव डोकेदुखीला खतपाणी मिळत असल्याचा दावा वॉटेमबर्ग यांनी केला आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा