तंबाखू सेवनाने तोंडाचा कर्करोग होण्याच्या दाट शक्यतेसह इतर आजारही बळावत आहेत. याबाबत जनजागृती होत असतानाही देशात २४.३ टक्के पुरुष आणि २.९ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत आहेत. दरवर्षी १ जानेवारी हा ‘जागतिक धूम्रपान विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय माणसाच्या जगण्याशी, संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही. तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे आाढळून आले आहे.
तंबाखूचे चैनी, गट्टू, गुटका, गुडाकू, जर्दा, तईबूर, स्नफ इत्यादीच्या रूपात सेवन होते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याने इतरांना फारसा त्रास होत नाही. मात्र सिगारेट, विडी, सिगार, पाईप्स, हुक्का, चिलीम, हुकलीस, चुट्टा, चिरुट इत्यादीने परिसरातील इतर व्यक्तींना त्रास होतो.  शरीरात धूर प्रवेश केल्याने तंबाखू न खाणारेही अप्रत्यक्षपणे धूम्रपानाचे शिकार होतात. तंबाखूमध्ये जवळपास चार हजार रसायने आढळतात. त्यातील कमीत कमी २०० विषारी घटक आहेत. जे निकोटीन, कार्बन मोनोक्साईड, टार, अरसेनिक, फॉरमॅल्डेहाईड इत्यादींचा विषारी घटकांमध्ये समावेश होतो.
तंबाखू खाण्यास कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींचा देखील परिणाम होतो. याशिवाय समवयस्कांचा प्रभाव, प्रयोग करून पाहणे, मतांचा प्रभाव, उत्सुकता, फिल्मी कलाकारांचे अवलोकन, चित्रपटातील मॉडेल्स, जाहिरातींचा प्रभाव, स्वत:चे मन शांत करण्यास, जागरुक राहण्यास, ताजेतवाने वाटण्यास, धाडस वाढवण्यास, कामाची क्षमता वाढवण्यास आणि मानसिक आरोग्यासाठी तसेच निष्काळजी प्रवृत्ती असल्यास तंबाखूचे सेवन केले जाते.
सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना, कामाच्या ठिकाणी आणि घरातील सदस्यांजवळ धूम्रपान केल्यास त्याच्यातील विषारी रासायनिक घटकांमुळे कर्करोग होण्याचा संभव अधिक असतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तंबाखू सेवनामुळे हृदय विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, गुंतागुंतीचे फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग, स्ट्रोक, श्वसन संस्थांचे आजार होतात. यापैकी ४० टक्के आजार हे धूम्रपानाशी संबंधित आहेत. महिलांच्या धूम्रपानामुळे वेगवेगळी गुंतागूंत निर्माण होते. गर्भधारणेशी संबंधित गुंतागूंत, अपुऱ्या दिवसांची प्रसूती, कमी वजनाच्या बाळाचा जन्म इत्यादी. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम माहिती असतानाही आजही भारतात २४.३ टक्के भारतीय पुरुष आणि २.९ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत आहेत. प्रत्येक वर्षी १ जानेवारी हा ‘धूम्रपान विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून तंबाखू भारतीय माणसाच्या जगण्याशी, संस्कृतीशी जुळलेली आहे.
केरळमधील काही गावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत लहान मुलांद्वारे तंबाखू देऊन केले जाते. भारतातील काही विशिष्ट भागातील कुटुंबातील लग्न समारंभात पाहुण्यांना तंबाखू देऊन सन्मान करण्याची प्रथा आहे. मिझोरमच्या ग्रामीण भागात स्वागत करण्याची ‘ताइबूर’ ही प्रथा तंबाखू देऊनच साजरी केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा