Chia Seeds Benefits : चिया सीड्सचं सेवन आजकाल भरपूर लोक करतात. कारण चिया सीड्स पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. काहीजण असेही म्हणतात की चिया बिया चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. पण हे खरंच खरं आहे का? या लहान काळ्या बिया तुम्हाला तुमची चरबी कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करू शकतात? अलीकडेच, फिटनेस कोच रॅल्स्टन डिसोझा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर चिया सिड्स आणि चरबी कमी करण्याबद्दलचे उत्तर दिले आहे.

चरबी कमी होणे आणि वजन कमी होणे ही एकच गोष्ट आहे का?

चरबी कमी होणे आणि वजन कमी होणे ही एकच गोष्ट आहे का? बरेच लोक या शब्दांचा परस्पर वापर करतात, परंतु त्यांचे वेगळे अर्थ आहेत. चरबी कमी होणे म्हणजे केवळ शरीरातील चरबी कमी होणे होय, तर वजन कमी होणे म्हणजे शरीराचे एकूण वजन कमी होणे होय. तुमच्यासाठी सर्वात योग्य पर्याय तुमच्या वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून असेल.

चरबी कमी करण्यासाठी चिया सिड्स: चिया सीड्स एक अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो अनेक पोषक तत्वांनी युक्त असून वजन कमी करण्यासाठी याचा अधिक फायदा करून घेतला जातो. तसंच त्वचा आणि केसांनाही याचा लाभ मिळतो. फायबर, प्रोटीन, अनसॅच्युरेडेट फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक मायक्रोन्यूट्रिअट्ंस चिया सीड्समध्ये आढळतात. “चिया बिया खूप पौष्टिक असतात आणि फायबरने भरलेले असतात, त्याचे सेवन केल्यानं तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक नियंत्रित करण्यास मदत होते.

कंबर होईल कमी

चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीन दोन्ही भरपूर असतं. या दोन्हींची वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका असते. यात असे अनेक पोषक तत्व असतात जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवतात. यात असलेल्या फायबरमुळे भूकही कंट्रोल होते.

कसं कराल सेवन?

चिया सीड्सचं पाणी

तुम्ही चिया सीड्सचं पाणी पिऊ शकता. त्यासाठी चिया सीड्स पाण्यात भिजवून ठेवा. रात्री झोपण्याआधी एक चमचा चिया सीड्स एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्स चावून खावेत आणि पाणी प्यावे. चिया सीड्सच्या पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.

चिया सीड्स आणि लिंबू पाणी

लिंबू पाणी आणि चिया सीड्स दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत. दोन्हींचं एकत्र सेवन केलं तर जास्त फायदे मिळतील. त्यासाठी एक ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस पिळा त्यात एक चमचा चिया सीड्स आणि एक चमचा मध टाका. याच्या नियमित सेवनाने इम्यूनिटी बूस्ट होते आणि वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव होतो.

Story img Loader