हिमाचल प्रदेशातील मंडीच्या आयआयटीतील वैज्ञानिकांनी चिकुनगुन्या विषाणूच्या प्रथिनातील काही गडद भाग शोधून काढले असून त्यातून चिकुनगुन्या रोगावर नवीन औषधे तयार करणे शक्य होणार आहे. गर्द रंगातील प्रोटियम हे प्रथिनांचे जाळे असून त्याचा वेध नेहमीच्या एक्स रे क्रिस्टलोग्राफी व इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या तंत्रांनी घेता येत नाही. नेहमीच्या प्रथिनांप्रमाणे ही प्रथिने विशिष्ट त्रिमिती रचनेत गुंडाळलेली नसतात, त्यामुळे त्यांच्या गुणधर्माचा शोध घेणे खूप कठीण असते. मंडी येथील आयआयटीचे सहायक प्राध्यापक रजनीश गिरी यांनी चिकुनगुन्या विषाणूच्या प्रथिनांचे स्वरूप व रचना समजावून घेण्यासाठी संगणनात्मक पद्धतीचा वापर केला आहे. साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्राध्यापक व्लादिमीर वेस्र्की यांनी त्यांच्यासमवेत संशोधन केले असून त्याबाबतचा शोध निबंध ‘आरएससी अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. यात विषाणूचे रेणवीय गुणधर्म ओळखण्यात यश आले आहे. चिकुनगुन्या हा डासांमुळे होणारा रोग असून त्याच्या विषाणूबाबत पुरेशी माहिती नाही, असे गिरी यांचे म्हणणे आहे. चिकुनगुन्या विषाणूची प्रथिने ही रोगनिदानात फार महत्त्वाची ठरणार आहेत. या विषाणूतील प्रथिनांच्या प्रथिनांशी होणाऱ्या क्रिया समजल्यानंतर त्यावरील औषध शोधून काढणे सोपे होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दर वर्षी विषाणुजन्य आजारांनी १५ लाख लोक मरतात. मानवासह सस्तन प्राण्यांना ३ लाख २० हजार विषाणूंचा संसर्ग होत असतो. त्यांना रोखणे हे मानवजातीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.
चिकुनगुन्या विषाणूची प्रथिनरचना उलगडण्यात यश
नेहमीच्या प्रथिनांप्रमाणे ही प्रथिने विशिष्ट त्रिमिती रचनेत गुंडाळलेली नसतात.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2018 at 00:34 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chikungunya virus infection