प्रत्येक मुलांना सायकल चालवायला खूप आवडते. मुले कधी घराच्या आत, कधी गच्चीवर तर कधी अंगणात सायकल चालवताना दिसतात. अनेकवेळा तुम्ही सायकल घरच्या बाहेर अशीच ठेऊन देतात. दरम्यान काही वेळा सायकल या अधिक काळ बाहेर असल्याने सायकलमध्ये घाण साचते आणि पाणी साचल्याने गंजही येतो. अशा परिस्थितीत पालकांना सायकल बदलणे भाग पडते. तुमच्या मुलाच्या सायकललाही गंज चढला असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. घरी असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही सायकलवरील गंज अगदी सहज साफ करू शकता. चला तुम्हाला अशाच काही खास टिप्स आणि ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.

लिंबू आणि बेकिंग सोडा वापरा

बेकिंग सोडा घराच्या स्वच्छतेसाठी खूप मदत करतो. यामध्ये असलेले एक्सफोलिएटिंग गुणधर्म गोष्टी स्वच्छ करण्यात मदत करतात. जर बेकिंग सोडामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळला तर ते अधिक चांगले स्वच्छ करते. यासाठी आधी पाणी गरम करून त्यात लिंबाचा रस टाकावा. आता या मिश्रणात बेकिंग सोडा मिसळा. यानंतर, या द्रावणाच्या मदतीने सायकलवरील गंज साफ करा. जुन्या टूथब्रशच्या मदतीने सायकल स्वच्छ करा आणि शेवटी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. तुमची सायकल पूर्णपणे स्वच्छ होईल आणि नवीन सारखी चमकेल.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एरोसोलचा वापर करा

मुलांच्या सायकलवर कोणत्याही प्रकारचे डाग किंवा चिन्ह असल्यास ते काढण्यासाठी एरोसोलचा वापर केला जाऊ शकतो. कारण गंजाचे डाग एरोसोलने सहज काढता येतात. यासाठी एरोसोल फवारणीच्या बाटलीत भरून ते गंजलेल्या भागावर शिंपडा. काही वेळाने सायकल स्वच्छ कापडाने पुसून टाका.

लिंबाचा रस आणि मीठ घालून स्वच्छ करा

लिंबाचा रस मीठ क्रिस्टल्स सक्रिय करतो. हे मिश्रण मऊ करून गंज काढून टाकण्यास मदत करते. यासाठी गंजलेल्या भागावर थोडे मीठ शिंपडा आणि नंतर त्यावर लिंबाचा रस लावा. गंजलेल्या भागावर जास्त मीठ आणि थोडासा लिंबाचा रस लावा. त्याचा जाड थर तयार करा. सायकलवर थर सेट होऊ द्या आणि दोन ते तीन तास असेच राहू द्या. आता, लिंबाच्या सालीतून मीठ काढून टाका आणि नंतर सायकल पूर्णपणे पुसून टाका. लिंबू लवकर गंज काढून टाकतो.

अॅल्युमिनियम फॉइल आणि व्हाइट व्हिनेगर

व्हाइट व्हिनेगर गंज काढून टाकण्याचे काम वेगाने करते. यासाठी तुम्हाला गंजलेला धातूचा पृष्ठभाग रात्रभर व्हिनेगरमध्ये बुडवावा लागेल, जेणेकरून गंज सहज निघू शकेल. पण तुम्ही सायकल व्हिनेगरमध्ये बुडवू शकत नाही, त्यामुळे गंजलेले भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही थोडे व्हिनेगर सायकलवर शिंपडा आणि आता अॅल्युमिनियम फॉइल व्हिनेगरमध्ये बुडवा. नंतर ते गंजलेल्या भागावर ठेवा आणि जोपर्यंत गंज हलका होत नाही तोपर्यंत स्क्रब करा. यास थोडा वेळ लागू शकतो परंतु तो निघून जातो.

Story img Loader