बालवयात अनेक गोष्टींची कुतुहूलता आणि उत्सुकताही असते. मात्र यातूनच अनेकदा चुकीच्या गोष्टींमध्ये मुलं गुंतण्याची शक्यता असते. सध्याच्या घडीला लहान मुलांबाबत एक समस्या प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे ऑनलाइन विश्व… मुलं या ऑनलाइन दुनियेच्या जाळ्यात अडकली असून याचा परिणाम त्यांच्या बालमनावरही होताना दिसत असतो. मुलं नक्की काय बघतात? ते ऑनलाइन का असतात? त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो? या अशा मुलं आणि ऑनलाइन विश्वाबद्दलची अनेक प्रश्नांची उत्तरे आणि माहिती आपण लोकसत्ताच्या ‘गोष्ट बालमनाची’ या विशेष सीरिजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. समाजमाध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेमिंग, पॉर्न, आई वडिलांच्या मोबाइलमधल्या गॅलरीत राहून गेलेल्या क्लिप्स अशा अनेक माध्यमातून लहान मुलं ऑनलाइन विश्वातल्या अनेक गोष्टींकडे आकर्षित होतात. हा प्रवास कसा होतो? तो टाळता येणं शक्य आहे का? त्यावर काही मार्ग आहे का? अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.