Covid-19 Vaccination Registration for children’s: १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातल्यांचं लसीकऱण ३ जानेवारीपासून अर्थात आजपासून सुरु होत आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थी आयडीने कोविड लसीसाठी नोंदणी कशी करावी?
डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा (आइडेंटिटी प्रूफ) म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसतील.
(हे ही वाचा: मोठी बातमी! १५ ते १८ वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार)
CoWIN प्लॅटफॉर्मवर तुमच्या मुलांच्या लसीकरणाची नोंदणी कशी करावी?
स्टेप १ – सर्व प्रथम Covin App वर जा. तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
स्टेप २ – आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
स्टेप ३ – तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर जेंडर आणि जन्मतारीख निवडा.
स्टेप ४ – मेंबर एॅड झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
स्टेप ५ – आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
स्टेप ६ – लसीकरण केंद्रावर, तुम्हाला संदर्भ आयडी आणि सीक्रेट कोड प्रदान करावा लागेल. जे तुम्ही नोंदणी केल्यावर तुम्हाला मिळेल.
स्टेप ७ – त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.
(हे ही वाचा: ६० वर्षावरील नागरिकांना मिळणार बूस्टर डोस; व्याधी असणाऱ्यांना प्रमाणपत्र बंधनकारक)
३० पेक्षा जास्त देशांमध्ये मुलांचे लसीकरण
जगभरातील ३० हून अधिक देशातील मुलांना कोरोनाची लस देत आहेत. क्युबामध्ये, दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे, तर दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्समध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे.
दुसरा आणि प्री-कॉशन डोसमध्ये ९ महिन्यांचे अंतर आवश्यक
डॉ. आर.एस. शर्मा यांच्या मते, जर तुमचे वय ६० वर्षे असेल आणि तुम्ही दोन्ही डोस घेतले असतील तर दुसरा डोस आणि तुम्ही नोंदणी करत असलेल्या दिवसातील फरक ९ महिन्यांपेक्षा जास्त (३९ आठवडे) असेल तर तुम्ही पात्र आहात. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना १० जानेवारीपासून करोना लसीचा प्री-कॉशन डोस दिला जाईल.