प्रत्येक आई-वडीलांना त्यांचे मूल निरोगी आणि सुदृढ असावं असं वाटतं. यासाठी ते आपल्या मुलाला अनेक पौष्टिक पदार्थ खायला घालतात. मात्र, लहान मुलं पालकांनी दिलेले पदार्थ खाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेकदा पालक मुलांना जबरदस्तीने पदार्थ खायला घालण्याचा प्रयत्न करतात. तरिदेखील मूलं ते खात नाहीत आणि खाल्लंच तर ते अर्धवट खातात.
त्यामुळे अन्न वाया जातेच, शिवाय अन्नातील पोषक तत्व देखील मुलांना हवं तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत. अशा वेळी अनेक पालक लहान मुलांच्या हातात मोबाईल देवून त्यांना न आवडणारे पदार्थ खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे ते मुलांना खाताना मोबाईल घेण्याची सवय लागते. शिवाय मोबाईल हातात नसेल तर ते जेवायला तयार देखील होत नाहीत. अशा अनेक तक्रारी पालक करतात.
हेही वाचा- शुद्ध मध व भेसळयुक्त मध कसे ओळखायचे? जाणून घ्या याची सोपी पद्धत
शिवाय जर मुलांना लहानपणापासूनच योग्य आहार दिला तर त्यांचा मानसिक व शारीरिक विकास चांगला होता. यासाठी त्यांना पौष्टिक आहार देण्याची सवय लावायला हवी. पण त्यावेळी त्याला मोबाईलचं व्यसन लागू नये याची देखील काळजी घ्यायला हवी. मुलांना मोबाईलशिवाय जेवणाची आवड लागावी यासाठी काय करावं याबाबतच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.
आवडते पदार्थ बनवा –
जर तुम्हाला मुलांनी ताटात वाढलेलं संपुर्ण अन्न खावं असं वाटत असेल तर, यासाठी तुम्हाला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवावे लागतील. तसंच जेवण बनवायच्या आधी मुलांना एकदा त्यांना काय खायचं हे विचारा आणि त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवा.
वेगवेगळ्या आकाराच्या चपात्या बनवा –
हेही वाचा- अति दूध प्यायल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या याचे योग्य प्रमाण
मुलांना नेहमी काहीतरी वेगळं पाहायला, खायला आवडतं त्यामुळे रोज एकच प्रकारच्या चपात्या आणि भाज्या पाहून आणि खाऊन देखील मुलं कंटाळतात. त्यामुळे लहान मुलं अन्न खायला नकार देतात. त्यासाठी जर तुम्ही रोज वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या, ब्रेड आणि चपात्या बनवून खायला दिल्या, तसंच सकाळी नाश्त्यासाठी पराठे देखील वेगवेगळ्या आकाराचे बनवा. शिवाय भाज्यांची चव बदलण्यासाठी तुम्ही मुलांना आवडतील असे मसाले जेवणात वापरा.
वेळेत जेवण द्या –
हेही वाचा- Coconut Water: नियमित नारळ पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून स्वत:ची सुटका करुन घ्या
अनेकवेळा मुलांना भूक नसताना आई-वडील जबरदस्तीने जेवायला सांगतात. त्यामुळे ते अर्धवट आणि मनात नसताना जेवतात. त्यामुळे मुलांना वेळेत जेवण देण्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. यासाठी जर मुलं खेळून आल्यानंतर त्यांना जेवायला वाढा कारण खेळून दमल्यामुळे मुलांना जास्त भूक लागते आणि ते पोट भरुन जेवतात.
नवनवीन पदार्थ बनवा –
तुम्ही दररोज नवीन डिश बनवल्याने मुलाला ती खाण्याची आवड निर्माण होते. शिवाय लहान मुलांना प्रत्येक गोष्टीबद्दल जास्त उत्सुकता असते. त्यामुळे ते नवीन पदार्थ खाणं शक्यतो नाकारत नाहीत. त्यामुळे ते नवीन पदार्थ खाण्यासाठी उत्सुक असतात.