देशात मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होतात. विशेषकरून शालेय वाहनांचे अपघात घडल्याचेही प्रकार समोर आले आहेत. असे होऊ नये, आपली मुले सुरक्षित राहावी यासाठी थोडी काळजी घेतल्यास मोठा अनर्थ टळू शकतो. पुढील उपाय तुमच्या मुलांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

१) सीट बेल्ट लावा

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

मुलांना कारने घेऊन जायचे असल्यास आधी तुम्ही आणि मुलांनी सीट बेल्ट घालायलाच हवे. सीट बेल्टमुळे तुम्हाला आणि मुलांना सुरक्षा मिळेल. अपघातात सीट बेल्ट तुम्हाला जागेवरच ठेवेल, पुढच्या सीटवर आदळू देणार नाही. परिणामी दुखापत होणार नाही. तसेच कार हळू चालत असतानाही इकडे तिकडे वळल्यास मुले सीटवरून खाली पडू शकतात. त्यामुळे सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, जो पर्यंत मुले सीटबेल्टमध्ये फीट होत नाही, तोपर्यंत बुस्टर सीटचा वापर केला पाहिजे.

(‘या’ ३ जीवनसत्वांच्या कमतरतेने दातांमध्ये होतात वेदना, आहारात करा हा बदल)

२) मागील सीटवर बसवा

मुलांना मागील सीटवर बसवणे हा चांगला पर्याय असू शकतो. एअरबॅग असणाऱ्या कारचा अपघात झाल्यास एअर बॅग स्टियरींग आणि डॅशबोर्डने फाटतात आणि मोठ्या फुग्यासारखे पसरतात. म्हणून १२ वर्षांखालील मुलांना कारच्या पुढील सीटवर बसवू नका, कारण एअरबॅग उघडल्यास मुलांना दुखापत होऊ शकते. मुलांना मागील सीटवर बसवा.

३) चालत्या बसमध्ये मुलांना चढवू नये

लहान मुलांना चालत्या बसमध्ये चढवू नये. शाळेची बस थांबल्यावरच त्यांना बसच्या आत चढू द्या. चालत्या बसमध्ये मुलांना चढवणे हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

(एलॉन मस्कने त्यांच्या फिटनेसबाबत केला खुलासा, उपवासासह सांगितली ‘ही’ औषध)

४) रांग बनवा

विद्यार्थ्यांनी रांग बनवूनच बसमध्ये प्रवेश केला पाहिजे. बसमध्ये प्रवास करताना मुलांनी उभे राहू नये. कारण मोठ्या वळणावरून बस गेल्यास मुले पडू शकता.

५) चालत्या बसमध्ये या गोष्टी करू नये

चालत्या बसमध्ये कुदू नये आणि धावू नये. एका ठिकाणी बसून राहावे. तसेच बसमधून खाली उतरताना रोलींग पकडून खाली उतरले पाहिजे. बसमधून उतरल्यानंतर तिच्या मागून जाऊ नये.