Children’s Day 2022: दरवर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबरला देशात बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची, लहानग्यांमध्ये चाचा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नेहरूंच्या स्मृती प्रित्यर्थ हा एक दिवस खास चिमुकल्यांसाठी समर्पित केला जातो. सर्वच आई वडिलांसाठी आपलं बाळ खास असतं पण हीच बाळं कधी कधी पालकांच्या पार नाकी नऊ आणतात हे ही तितकंच खरं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदाहरणच द्यायचं तर, तुम्ही हा अनुभव घेतला आहे का सांगा.. जेव्हा तुम्ही फोनवर बोलत असता नेमकं त्याच वेळेला तुमच्या बाळाला तुमच्याकडून काहीतरी हवं असतं, जोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे पूर्ण लक्ष देत नाही तोपर्यंत तो काही तुमच्या नावाचा पुकारा थांबवत नाही.. अनेक पालकांनी वर्क फ्रॉम होममध्ये हा अनुभव नक्कीच घेतला असेल, पण अशावेळी कधीतरी पालकांचा संयम संपतो व ते बाळावर चिडतात अशाने ही मुलं शांत व्हायचं तर दूरच पण आणखी धिंगाणा घालू लागतात मग अशा हट्टी बाळाला नेमकं शांत करायचं कसं? आज आपण हेच जाणून घेणार आहोत .

इंस्टाग्रामवर @raising_shaan या अकाऊंटवरून एका स्मार्ट आईने अशाच काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या हट्टी बाळाला आनंदी ठेवून शिस्त लावायला मदत करतील.

  • जर तुमचं बाळ कामात लुडबुड करत असेल आणि त्यावेळेस तुम्हाला त्याचं म्हणणं ऐकून घेणं शक्य नसेल तर त्याच्यावर चिडू नका.
  • उलट त्याला स्पष्टपणे व प्रेमाने थांबायला सांगा.
  • जर बाळ चार ते पाच वर्षाचं असेल तर त्याला तुम्ही हे शिकवू शकता की जर तुला अगदीच महत्त्वाचं सांगायचं असेल तर तसं तो तुम्हाला खुणेने कळवू शकतो.
  • तुमचं म्हणणं ऐकल्यावर तुम्ही तुमच्या बाळाला शाबासकी द्यायला हवी जेणेकरून पुन्हा तसे वागण्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळेल.
  • जर तुम्हाला माहित असेल कि तुमचे काही महत्त्वाचे काम आहे आणि त्यात अजिबात लुडबुड केलेली चालणार नाही तर काम सुरु होण्याआधीच बाळाला तसं सांगा.

दरम्यान, या स्मार्ट पद्धतीने तुम्ही बाळाला योग्य वयात संयमाचे धडे देऊ शकता, कधी कधी बाळाचे संगोपन हे आई वडिलांसाठी कठीण असते, या मानसिक तणावामुळे आई वडिलांची चिडचिड होऊ शकते पण तुमच्या बाळाला याची जाणीव नसते, किंबहुना तितकी समज त्या वयात येत नाही. अशावेळी तुम्ही बाळाला प्रेमाने समजावून सांगणे हे त्याला मदतीचे ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childrens day 2022 how to handle angry child who interrupts calls parenting hacks smart mom tricks viral on instagram svs