अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट. चॉकलेटचे विविध प्रकार बाजारात पहायला मिळतात. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट असे एक ना अनेक प्रकार आहेत. त्यातही वेगवेगळ्या आकाराचे, चवीचेही चॉकलेट्स सध्याच्या घडीला सहज उपलब्ध होतात. चॉकलेटच्या याच नव्या रंगरुपामुळे लहान-थोर सारेच त्याच्या मोहात पडतात. परंतु सध्य़ा बघायला गेलं तर चॉकलेट हे केवळ खाण्यासाठी नसून याचे काही गुणधर्मही आहेत जे आपल्याला माहित नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणताही पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचा दुष्परिणाम होणारच मात्र योग्य प्रमाणात त्याचे सेवन केले तर तो गुणकारी ठरु शकतो. याप्रमाणेच चॉकलेटचे योग्य प्रमाणात सेवन केले तर तो तुमची स्मरणशक्ती बळकट होण्यास मदत होते. हो हे खरं आहे. वयस्कर व्यक्तींनी चॉकलेटचे योग्य प्रमाणात सेवन केले तर त्यांची स्मरणशक्ती बळकट होते असे काही अभ्यासांमध्ये आढळून आले आहे.

१. चॉकलेटमध्ये कोको बीन हा मुख्य घटक असून यामध्ये असलेल्या फ्लावनोल्समध्ये शरीरातील पेशींचे संरक्षण करण्य़ाची क्षमता असते. फ्लावनोल्स या घटकामुळे वयस्कर व्यक्तींची आकलन क्षमता, स्मरणशक्ती यांच्या कार्यामध्ये सुधारणा घडविण्यासाठी मदत होते.

२. तणाव किंवा निराशेच्या काळामध्ये चॉकलेट तुमचा सोबती होऊ शकतो. निराशेच्या काळात चॉकलेट खाल्ल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या काळामध्ये चॉकलेट खाणे कधीही उत्तम.

३. उतारवयात चेह-यावर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे यासारखे शारीरिक बदल घडत असतात. मात्र चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन जरुर करावे. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेट बाथ, फेशियल, पॅक आणि व्हॅक्स यासारखे पर्यायही उपलब्ध झाले आहेत.

४. अनेक जणांना कमी रक्तदाबाची समस्या असते. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे अशा परिस्थिती काय करावे हे सुचत नाही. मात्र जर तुमच्या जवळ चॉकलेट असेल तर तुमच्यावर ही वेळ येणार नाही. रक्तदाब कमी झाल्याचे समजताच त्यावेळी चॉकलेट खाल्ले तर तत्काळ रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.

५. आजकाल अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आढळून येते. शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि त्यामुळे होणा-या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी चॉकलेट उपयुक्त ठरते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)