Viral Video : चहा हा असा पदार्थ आहे जो लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. भारतात दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते. काही लोक दिवसातून दोन-तीन वेळा चहाचे सेवन करतात. काही लोकांना चहा इतका प्रिय आहे की एकदिवस चहा प्यायले नाही तर त्यांचं कामात लक्ष लागत नाही. तुम्हाला सुद्धा चहा आवडतो का?
खरं तर चहाचे अनेक प्रकार आहे. दुधाचा चहा, काळा चहा, ग्रीन टी, लेमन टी, मसाला चहा इत्यादी. पण तुम्ही कधी चॉकलेट चहा प्यायला आहात का? काही लोकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चॉकलेट चहाची रेसिपी सांगितली आहे. तुम्हाला जर चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पाहून चॉकलेट चहा घरी तयार करू शकता. (chocolate tea do you ever try chocolate chaha recipe video goes viral on social media)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेनी बनवला चॉकलेट चहा!

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

साहित्य

  • पाणी
  • चहापत्ती
  • साखर
  • चॉकलेट
  • दूध

कृती

  • सुरुवातीला एक पातेले घ्या.
  • त्या पातेल्यात एक कप पाणी टाका
  • थोडी चहापत्ती आणि साखर टाका
  • थोडा वेळ चहाला उकळी येऊ द्या.
  • त्यानंतर त्यात डेरी मिल्क चॉकलेट टाका. (तुम्हाला आवडते ते चॉकलेट तुम्ही टाकू शकता.)
  • त्यानंतर चहाला पुन्हा उकळी येऊ द्या
  • त्यानंतर एक कप दूध टाका.
  • चहाला उकळी आली की चहा गाळून घ्या
  • तुमचा गरमा गरम चॉकलेट चहा तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

homecheff_renu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चॉकलेट चहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चहा बरोबर अन्याय, जनता माफ करणार नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “हटके रेसिपी आहे, मला आवडली” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान वाटत आहे, मी पण करून पाहील.” एक युजर लिहितो, “साखर टाकली नाही तरी चालेल. चॉकलेटमध्ये साखर असते” अनेक युजर्सना ही रेसिपी खूप आवडली आहे.