Cholesterol Ayurvedic Remedy: अगदी प्राचीन काळापासून आरोग्यासाठी आयुर्वेदाचं महत्त्व खूप फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेदातला एक उपाय पिढ्यान् पिढ्या उपयुक्त ठरत आलाय आणि तो म्हणजे सैंधव मीठ (Rock Salt) व आले पावडर यांचे मिश्रण. जेवणाअगोदर हे मिश्रण घेतल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होण्याच प्रमाण शून्यात असतं. तसंच यामुळे पचन चांगलं होण्यास मदत होते.

सर्वाधिक जुना असलेला ‘हा’ उपाय नक्की कसा काम करतो ते जाणून घेऊया (Cholesterol Ayurvedic Remedy)

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

सैंधव मीठ व आल्याची पावडर यांचे गुणधर्म (Rock Salt and Ginger Powder)

सैंधव मीठ

नेहमीच्या मीठापेक्षा सैंधव मिठामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे फायदेशीर घटक असतात. ही खनिजं शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास, चयापचय वाढविण्यास व एकूण पाचन आरोग्यास चालना देण्यास मदत करतात.

आले पावडर

आलं हे त्याच्या दाहकविरोधी (anti-inflammatory) व अँटिऑक्सिडंट (antioxidant) या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. शतकानुशतकं आलं हे विविध आजारांवरील उपचारासाठी वापरलं जात आहे. विशेषत: पचनसंस्थेशी संबंधित आजारासाठी याचा अधिक वापर केला जातो.

आल्यामध्ये जिंजरॉलसारखे (gingerol) बायोअ‍ॅक्टिव्ह कम्पाउंड्स असतात; जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास, पचन सुधारण्यास व पोट फुगणे (bloating) कमी करण्यास मदत करतात.

हा उपाय कसा काम करतो?

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत (Preventing cholesterol formation)

संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आलं महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

‘Journal of Nutrition’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून सिद्ध झालंय की, की आलं रक्तातील HDL Levels (चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी) वाढवताना LDL (खराब कोलेस्ट्रॉलची पातळी) कमी करण्यास मदत करते.

आल्यामध्ये सैंधव मिठामधील आवश्यक खनिजं एकत्र केल्यावर, हे मिश्रण शरीरातील कोलेस्ट्रॉल अधिक प्रभावीपणे नियंत्रण करण्याची क्षमता वाढवू शकते.

हेही वाचा… Anant Ambani Wedding Gift: अनंत अंबानीने शाहरुख खान, रणवीर सिंगला गिफ्ट केलेल्या २ कोटींच्या घड्याळात नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या लग्झरी घड्याळाचे फिचर्स

Bloating कमी करण्यास आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत

अन्नपचन नीट न झाल्यानं आणि आतड्यांमध्ये गॅस तयार झाल्यानं अनेकदा ब्लोटिंगचा त्रास होतो. आल्याचे पाचक गुणधर्म पाचक एन्झाइम्सचा (digestive enzymes) स्राव उत्तेजित करण्यास मदत करतात. त्यामुळे अन्न अधिक बारीक प्रमाणात कमी करण्यास मदत होते.

सैंधव मीठ पोटातील आम्ल संतुलित करून पोषक घटकांचे चांगले शोषण करण्यासदेखील मदत करते. एकत्रितपणे आलं आणि सैंधव मीठ ब्लोटिंग आणि एकूण पाचन आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करतात.

हा उपाय नक्की कसा तयार कराल आणि कसा वापराल?

एका व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये डॉक्टर तन्मय गोस्वामी यांनी हे मिश्रण वापरण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे. डॉ. गोस्वामी यांच्या सांगण्यानुसार हा उपाय करण्यासाठी…

  • अर्धा चमचा सैंधव मीठ आणि अर्धा चमचा आले पावडर ३० मिली पाण्यात मिसळा.
  • पावडर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत नीट ढवळून घ्या.
  • जेवणापूर्वी १५ मिनिटे आधी हे पेय प्या.

Story img Loader