Ghee Good For Heart: कोलेस्टेरॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना सतत प्रश्न पडतो की तूप खाणे फायदेशीर आहे की हानिकारक? तूप खाल्ल्याने चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते असे अनेकदा म्हटले जाते. सर्व प्रथम, हे जाणून घेणे आवश्यक आहे की जेव्हा शरीरात चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा खराब कोलेस्ट्रॉल आपोआप कमी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एचडीएल वाढल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि लोकांना कोणताही त्रास होत नाही. आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की तुपाच्या सेवनाने कोलेस्टेरॉलच्या पातळीवर खरोखर काही परिणाम होतो का? लोकांनी दिवसभरात किती तूप खावे?

कोणत्या प्रकारचे तूप खाणे हानिकारक आहे?

साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि जनरल फिजिशियन डॉ. बिमल छाजर यांच्या मते, कोणत्याही स्वरूपात तुपाचे सेवन करणे सुरक्षित नाही आहे. गाईच्या दुधापासून बनवलेले तूप आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप यात फारसा फरक नाही. दोन्हीमधील कॅलरीज आणि कोलेस्टेरॉल जवळपास सारखेच असतात. घरी बनवलेले तूप आणि बाहेरचे तूप यात फरक नाही. हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी तुपाचे सेवन बंद करा, जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल तर तुपाचे सेवन पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे.

तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढते का?

डॉ.बिमल छाजर यांच्या मते तुपात ट्रायग्लिसराइड तसेच कोलेस्ट्रॉल असते. तुपात एक चतुर्थांश कोलेस्ट्रॉल असते. हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी, १० मिलीग्रामपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल खाऊ नये. १०० ग्रॅम तुपात २५० मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. १०० ग्रॅम तूप खाल्ल्याने २५ दिवसांचा कोटा एका दिवसात संपू शकतो. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रात तूप चांगले मानले जात नाही. ज्यांना कोलेस्ट्रॉल रिवर्स करायचे आहे त्यांनी तूप आणि तेलाचा एक थेंबही सेवन करू नये.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ४ पदार्थ? डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत)

तुपामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते का?

अजिबात नाही, डॉ.बिमल यांच्या मते तुपात कोलेस्टेरॉल आढळते. सामान्य लोकांसाठी हे मर्यादित प्रमाणात फायदेशीर ठरू शकते, परंतु हृदयाच्या रुग्णांनी तुपाचे सेवन अजिबात करू नये. कारण १ ग्रॅम तुपात सुमारे २.५ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी हे खूप घातक ठरू शकते.

तर दुसरीकडे आयुर्वेदानुसार गाईच्या दुधापासून बनवलेले तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गाईचे दुधाचे तूप खाल्ल्याने शरीरातील पित्ताचा त्रास कमी होतो. यामुळे शरीराची कार्यप्रणाली सुधारते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

तूप किती सेवन करता येईल?

डॉ. बिमल यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या काळी एका वेळेस तूप पचवत असत, त्यामागील कारण म्हणजे चालणे आणि मेहनत करणे. सध्या शारीरिक मेहनत शून्य आहे त्यामुळे तूप सेवन न करण्याचा प्रयत्न करा. तरीही, जर तुम्हाला ते करायचे असेल तर, एका दिवसात १ ते २ चमचे पेक्षा जास्त करू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cholesterol can increase by consumption of ghee know how much to consume it gps