सध्या सर्वत्र नाताळची तयारी सुरू आहे. यावर्षी हा सण कसा साजरा करायचा, कोणत्या ठिकाणी साजरा करायचा याची योजना आखली जात आहे. नाताळ हा वर्षातील शेवटचा सण असल्याने, त्यासह नवीन वर्षाच्या स्वागताची तयारीही सुरू असते. त्यामुळे दुप्पट आनंदात याची तयारी सुरू आहे. डेकोरेशन, वेगवेगळे खाद्यपदार्थ यांसह या सणाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे ‘सिक्रेट सांता’. याद्वारे आपल्या जवळच्या व्यक्तींना गुपचूप भेटवस्तू दिल्या जातात.
दरवर्षी ‘सिक्रेट सांता’ला काय भेटवस्तु द्यायच्या हा प्रश्न पडतो. यावर्षी तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक सुरक्षेची भेट देऊ शकता. यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत जाणून घ्या.
आणखी वाचा: तुम्हालाही मोज्यांशिवाय बूट वापरण्याची सवय आहे? जाणून घ्या याचा पायांवर काय परिणाम होतो
आर्थिक सुरक्षेच्या भेटीसाठीचे पर्याय:
फिक्स्ड डिपॉजिट
फिक्स्ड डिपॉजिट ही उत्तम आर्थिक भेटवस्तु आहे. ‘एफडी’मध्ये इतर बचत खात्यांपेक्षा अधिक व्याज मिळते.
म्युच्युअल फंड
मुलांसाठी म्युच्युअल फंड हा भेट देण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये मुलांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर उदा. शैक्षणिक खर्च, लग्नाचा खर्च यामधून निधी पुरवला जातो. ‘चिल्ड्रन गिफ्ट फंड’चे हायब्रीड व बॅलन्सड म्युच्युअल फंड असे दोन प्रकार आहेत.
गोल्ड इटीएफ
भेटवस्तु म्हणून सोनं देणे हे भारतात सर्वोत्तम भेटवस्तु मानली जाते. कोणत्याही आर्थिक अडचणीच्या काळात त्या सोन्याचा वापर करता येतो. मुलांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना सोन्याचे दागिने गिफ्ट देण्याऐवजी तुम्ही ‘गोल्ड इटीएफ’ किंवा ‘गोल्ड सेविंग फंड’ या स्वरूपात गिफ्ट करू शकता.
आणखी वाचा- Yearender 2022: यावर्षी ‘हे’ घरगुती उपाय झाले सर्वाधिक सर्च; यातला तुम्ही कोणता उपाय केला होता सर्च?
आरोग्य विमा
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे असा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्या विमा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जोडीदाराला यावर्षीची नाताळची भेट म्हणून तुम्ही आरोग्य विमा देऊ शकता.