Christmas 2021 Decoration Ideas : नवीन वर्ष सुरू होणार आहे, त्याआधी डिसेंबरमध्ये ‘ख्रिसमस’ साजरा केला जातो. ख्रिसमस डे दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जगभरातील लोक मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात. लोक या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. प्रभू येशूचा जन्म नाताळच्या दिवशी झाला. ख्रिश्चन धर्माशी संबंधित लोक या दिवशी चर्चमध्ये जातात आणि पूजा करतात. त्याच वेळी, प्रभु येशूचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी, ते घर सजवतात. ख्रिसमसच्या सजावटींपैकी सर्वात महत्वाचं म्हणजे ख्रिसमस ट्री. लोक ख्रिसमसच्या झाडाला दिवे, रंगीबेरंगी भेटवस्तू आणि मिठाई इत्यादींनी सजवून आनंद साजरा करतात. लहान मुलांसह कुटूंबातील मोठी मंडळी देखील ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी उत्सुक असतात. परंतु ख्रिसमस ट्री अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कसं सजवायचं, यासाठी जाणून घेऊयात ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स…
फळे आणि फुलांनी ख्रिसमस ट्री सजवा
आपण ख्रिसमसच्या झाडाला सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवू शकता. हिरव्या झाडावर लाल किंवा पांढरी फुले सुंदर दिसतील. तुम्हाला हवं असल्यास सजावटीत फुलांबरोबरच फळांचाही वापर करू शकता. ख्रिसमसच्या झाडांवर प्लास्टिकची फळे सजवा.
ख्रिसमसच्या झाडावर कौटुंबिक फोटो सजवा
ख्रिसमसच्या दिवशी तुम्हाला झाडाला अनोख्या पद्धतीने सजवायचं असेल, तर तुम्ही ख्रिसमसच्या झाडावर कुटुंबातील सदस्यांची छायाचित्रे लावू शकता. ख्रिसमसच्या झाडावर घरातील वडीलधाऱ्यांची किंवा मुलांची लहानपणीची छायाचित्रेही लावून सजवता येतात. या प्रकारची सजावट तुमच्या कुटुंबासाठी सुंदर तसंच भावनिक दिसेल.
आणखी वाचा : Christmas 2021: जाणून घ्या ‘मेरी’ हा शब्द कुठून आला, हॅप्पी ऐवजी ‘Merry Christmas’ का म्हणतात?
खाद्यपदार्थांसह ख्रिसमस ट्री सजवा
ख्रिसमसच्या झाडावर तुम्ही कँडी, चॉकलेट, लॉलीपॉप इत्यादी लटकवू शकता. या रंगीबेरंगी खाद्यपदार्थांमुळे ख्रिसमस ट्रीची सजावट आकर्षक होईल आणि घरात लहान मुले असतील तर त्यांना ही सजावट आवडेल.
आणखी वाचा : Christmas 2021 : Amazon ची ख्रिसमस ऑफर! प्रीमियम Chacolate वर सर्वात मोठी ऑफर, गिफ्टिंगसाठी ७५% डिस्काउंट
जर ख्रिसमस ट्री नसेल तर अशा प्रकारे सजवा
जर तुमच्याकडे ख्रिसमस ट्री नसेल किंवा तुमच्या घरात ख्रिसमस ट्री ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही घराच्या भिंतीवर ख्रिसमस ट्री सजवू शकता. यासाठी तुम्ही रंगीबेरंगी लहान ख्रिसमस ट्री बनवू शकता आणि त्यांना भिंतीवर टांगलेल्या भिंतींप्रमाणे सजवू शकता. यामुळे घरातील जागाही वाचेल आणि ख्रिसमसची सजावटही सुंदर दिसेल.