धूम्रपान करताना अनेकदा तरुण मुले एकमेकांच्या सिगारेटची देवाण-घेवाण करतात. मात्र असे करणे आरोग्याला हानीकारक असल्याचा इशारा अमेरिकेतील संशोधकांनी दिला आहे. सिगारेटची देवाण-घेवाण करणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेह आदी विकार आढळतात, असे या संशोधकांनी सांगितले.
संशोधकांनी उष्टावलेल्या सिगारेटचे सेवन करणाऱ्या ७ ते ११ वयोगटातील वयापेक्षा जास्त वजन किंवा लठ्ठ असलेल्या २२० मुला-मुलींच्या आरोग्याचे परीक्षण केले. या वेळी धूम्रपान करताना एकाच सिगारेटचा अनेकांमध्ये होणाऱ्या अदलाबदलीचा संबंध मुलांचे वाढलेले पोट आणि चरबीसोबतच शरीरातील वाढणाऱ्या मेदाच्या प्रमाणाशी असल्याचे आढळून आले.
यापैकी धूम्रपान करणाऱ्या मुलांवर मानसिक उपाय करण्याची प्रवृत्तीही कमी असल्याचे मत अमेरिकेतील ऑगस्टा विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज ऑफ जॉर्जियामधील कॅथेरिने डेव्हिस यांनी व्यक्त केले.
धूम्रपानाची देवाणघेवाण करणाऱ्या मुलांमध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण हे तुलनेपेक्षा जास्त असून हा धोका हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित आजार, मधुमेह आणि त्याव्यतिरिक्त आणखीन काही गोष्टीशी जोडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ऑगस्टा विद्यापीठाच्या मारथा एस. टिनगेन यांच्या मते, आपल्या शरीरात चरबीसारख्या चुकीच्या गोष्टीचा अंर्तभाव आहे, पण धूम्रपानाची देवाणघेवाण ही समस्या अधिकच क्लिष्ट करते. याशिवाय ज्या मुलांना धूम्रपान करताना एकाच सिगारेटचे देवाणघेवाण करण्याची सवय असते, त्यांच्यात मानसिकता पडताळणीच्या विविध चाचण्यांमध्ये खूपच कमी गुण मिळाले आहेत. मुलांमधील या कमतरतेचे विश्लेषण लक्ष वेधण्याच्या त्यांच्या मानसिकतेतील अभाव कारणीभूत असून वर्गात आणि मानक परीक्षांमध्ये गुणात्मक घसरणदेखील यामुळेच होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
संशोधकांच्या मतानुसार, सध्याची आधुनिक आरोग्य परिस्थितीमुळे आहार, शारीरिक क्रिया आणि लहान मुलांमधील तंबाखूचा वापर व त्याचा कुटुंबावर परिणाम होत असून त्या आधुनिक परिणामांना प्रतिबंध करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे संशोधन ‘लहान मुलांमधील लठ्ठपणा’ या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा