लिंबू वर्गीय फळांमधील घटकांच्या सेवणामुळे किडणीला होणाऱ्या विकारांवर मात करता येत असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
किडन्यांचा आकार वाढून त्यांची कार्यक्षमता बंद पाडू शकणारा आजाराने बरेच लोक ग्रासले जातात. अनुवंशिक असणाऱ्या किडणीच्या या आजारामुळे रक्तदाब वाढल्यामुळे रोग्याला डायलसिसवर ठेवावे लागते.
या आजारावर सध्या खूप थोड्या उपचार पध्दती आहेत.
रॉयल हॉलोवे विद्यापीठ, एसटी जॉर्जस, लंडन विद्यापीठ आणि किंग्स्टन विद्यापीठ लंडन या तीन विद्यापीठांमधील संशोधकांच्या एका गटाने एकपेशीय अमिबावर प्रयोग केले. या प्रयोगांमधून किडणीचा आकार मोठा होण्याच्या आजाराची कारणे शोधण्याचा प्रयत्न या संशोधन गटाने केला आहे.
“या संशोधनामुळे किडणीचा आकार मोठा होण्याच्या आजारावरील उपचार पध्दतीमध्ये संशोधन करण्यास वाव मिळणार आहे. या उपचार पध्दतीमुळे किडणीच्या या विकारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे,” असे रॉयल हॉलोवे विद्यापीठाच्या जिवशास्त्र शाखेचे प्रा. रॉबिन विल्यम्स म्हणाले.
लिंबू वर्गीय फळांमधून मिळणाऱ्या रसायनांपासून मानवी शरीरामध्ये औषधी गुणधर्म तयार होवून किडणीच्या विकारावर मात करता येत असल्याचे या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून पुढे आल्याचा दावा करण्यात आला आहे.
लिंबू वर्गीय फळांमुळे किडणीचे आरोग्य सुधारण्यास मदत!
लिंबू वर्गीय फळांमधील घटकांच्या सेवणामुळे किडणीला होणाऱ्या विकारांवर मात करता येत असल्याचे शास्त्रज्ञांनी
आणखी वाचा
First published on: 04-10-2013 at 04:50 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citrus fruit component may improve kidney health