लिंबू वर्गीय फळांमधील घटकांच्या सेवणामुळे किडणीला होणाऱ्या विकारांवर मात करता येत असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
किडन्यांचा आकार वाढून त्यांची कार्यक्षमता बंद पाडू शकणारा आजाराने बरेच लोक ग्रासले जातात. अनुवंशिक असणाऱ्या किडणीच्या या आजारामुळे रक्तदाब वाढल्यामुळे रोग्याला डायलसिसवर ठेवावे लागते.
या आजारावर सध्या खूप थोड्या उपचार पध्दती आहेत.
रॉयल हॉलोवे विद्यापीठ, एसटी जॉर्जस, लंडन विद्यापीठ आणि किंग्स्टन विद्यापीठ लंडन या तीन विद्यापीठांमधील संशोधकांच्या एका गटाने एकपेशीय अमिबावर प्रयोग केले. या प्रयोगांमधून किडणीचा आकार मोठा होण्याच्या आजाराची कारणे शोधण्याचा प्रयत्न या संशोधन गटाने केला आहे.
“या संशोधनामुळे किडणीचा आकार मोठा होण्याच्या आजारावरील उपचार पध्दतीमध्ये संशोधन करण्यास वाव मिळणार आहे. या उपचार पध्दतीमुळे किडणीच्या या विकारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे,” असे रॉयल हॉलोवे विद्यापीठाच्या जिवशास्त्र शाखेचे प्रा. रॉबिन विल्यम्स म्हणाले.
लिंबू वर्गीय फळांमधून मिळणाऱ्या रसायनांपासून मानवी शरीरामध्ये औषधी गुणधर्म तयार होवून किडणीच्या विकारावर मात करता येत असल्याचे या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून पुढे आल्याचा दावा करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा