एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या व्यक्तीला बक्षीस मिळालं की आपण सहज टाळ्या वाजवतो. एखादे भक्तीसंगीत किंवा भजन सुरू असेल तेव्हाही आपण टाळ्या वाजवत त्यात रमून जातो. टाळ्या वाजवण्यासारखी सोपी कृत आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते हे अनेकांना माहित नसते. टाळया वाजवल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाळ्या वाजवणे हिंदू धर्मग्रंथातील प्राचीन योगासनांपैकी एक आहे. आपल्या तळहातावर ३९ एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत जे वेगवेगळ्या अवयवांशी संबंधित आहेत. टाळ्या वाजवल्याने हे अवयव सक्रिय होतात. तसेच यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. कोणत्याही अवयवामध्ये एनर्जी ब्लॉक असल्यास तो काढून टाकण्यास टाळ्या वाजवाल्याने मदत मिळू शकते. यासह टाळ्या वाजवणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

आणखी वाचा: चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय होते? जाणून घ्या याचे शरीरावर होणारे परिणाम

टाळ्या वाजवण्याचे फायदे:

  • टाळ्या वाजवताना आपली शारीरिक हालचाल होते, त्यामुळे तेव्हा आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते, आपला आळस निघून जातो. जर कोणत्या विचारांची गुंतागुंत मनात सुरू असेल, तर टाळ्या वाजवल्याने आपल्याला शांत वाटू लागते. जेव्हा एखाद्या भक्तीसंगीत सुरू असताना किंवा भजन सुरू असताना टाळ्या वाजवल्याने भक्तीत तल्लीन होण्यास मदत मिळते. जेव्हा घरी किंवा मंदिरात आपण टाळ्या वाजवतो तेव्हा आजूबाजूला एक ऊर्जा निर्माण होते, जी वातावरण प्रसन्न करण्यास मदत करते.
  • लहान मुलांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि त्यांची कौशल्य वाढवण्यासाठी टाळ्या वाजवणे मदत करू शकते.
  • टाळ्या वाजवल्याने तळहातातील रिसेप्टर्सना चालना मिळते. ज्यामुळे मेंदूतील संवेदना अधिक जागृत होतात. टाळ्या वाजवणे कमी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. हात वर करून पाच मिनिटांसाठी टाळ्या वाजवल्यास रक्तदाब सामान्य होण्यास मदत मिळते.
  • टाळ्या वाजवल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते, कारण यामुळे पांढऱ्या रक्तपेशी मजबुत होण्यास मदत मिळते. यामुळे हृदयाचे विकार, हायपरटेन्शन, इनसोमनिया, डोकेदुखी, मधुमेह, सांधेदुखी, सर्दी, दमा या आजारांपासून वाचण्यास मदत होते. तसेच यामुळे दिवसभर मनाला शांत आणि स्थिर वाटेल.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clapping can be very beneficial for health know its benefits for body pns