Clay Pot Vs Refrigerator: फार पूर्वीपासून आपल्या देशामध्ये पाणी साठवण्यासाठी मातीच्या मडक्यांचा वापर केला जात आहे. आजही अनेक घरांमध्ये मातीची मडकी पाहायला मिळतात. बरेच लोक रिफ्रेजरेटरच्या जागी या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी पिणे पसंत करतात. उन्हाळ्यामध्ये मडक्यामध्ये साठवलेले पाणी अधिक गार आणि आरोग्यदायी असते. आयुर्वदामध्येही मातीच्या मडक्यातून पाणी प्यायल्यामुळे मिळणाऱ्या फायद्याबद्दलची माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे.
प्लॅस्टिकच्या बाटल्यांची निर्मिती करण्यासाठी बीपीएसारख्या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे या बाटल्यांमधील पाण्यात हे रसायन मिसळले असण्याची शक्यता असते. याउलट मातीच्या मडक्यामधील पाण्यात कोणत्याही प्रकारच्या हानिकारक रसायने नसतात. यामुळे बहुतांश लोक घरामध्ये पाण्याची मडकी ठेवतात. रेफ्रिजरेटर हे विद्युत उपकरण आहे. त्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या थंड होण्यासाठी विजेची गरज असते. तर मडक्यांमध्ये साठवलेले पाणी नैसर्गिकरित्या गार होते. म्हणजेच मडक्यांच्या वापरामुळे विजेची बचत होते.
मातीच्या मडक्यामधील पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळीही वाढते. त्याव्यतिरिक्त हे पाणी शुद्ध असते, त्यामध्ये आवश्यक खनिजे देखील मुबलक प्रमाणामध्ये असतात. काहींच्या मते, या पाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होते. मडक्यातील पाण्याचे पीएच संतुलित असते. माती आणि पाणी यांचे घटक एकत्र आल्याने पीएच संतुलन निर्माण होते. हे पाणी शरीरासाठी फार लाभदायी असते.
आणखी वाचा – आंबा पाण्यात भिवजून मगच खा, जाणून घ्या यामागचे फायदे आणि तोटे
रेफ्रिजरेटरमध्ये बाटल्यांमध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. पचनक्रिया मंदावल्याने अन्न व्यवस्थितपणे पचत नाही. असे झाल्याने अन्नातील पोषक तत्त्वे शरीरामध्ये शोषली जात नाही. व्हॅगस मज्जातंतू हा दहावा क्रॅनियल मज्जातंतू आहे. फ्रीजमधील गार पाणी प्यायल्याने या मज्जातंतूला उत्तेजना मिळते. हा मज्जातंतू उत्तेजित झाल्यास हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होते. याव्यतिरिक्त हे पाणी प्यायल्यामुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकला असे आजारही बळवतात. अशा काही कारणांमुळे तज्ज्ञमंडळी रेफ्रीजरेटरच्या जागी मातीच्या मडक्याचा पर्याय निवडण्याचा सल्ला देतात.