आजकाल असलेल्या प्रदुषणामुळे चांदीच्या वस्तू, भांडी आणि दागदागिने त्यांची चमक कमी होते किंवा काही त्या काळवंडतात. तो काळपटपणा घालवण्यासाठी आपल्याला सोनाराकडे जावे लागते. मात्र, आपण घरात असलेल्या काही वस्तूंनी चांदीच्या भांडी किंवा वस्तूंचा काळवटपणा घालवू शकतो.
१. चांदीच्या वस्तूंना साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकतात. यासाठी बेकिंग सोड्यात गरम पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टने चांदीची भांडी साफ करा. यामुळे चांदीचा काळवटपणा निघेल.
आणखी वाचा : झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
२. एका मऊ कपड्यावर बेकिंग सोडा लावून चांदीची भांडी आपण साफ करा. त्यानंतर पाण्याने धुवून त्यांना कोरडे होऊ द्या.
आणखी वाचा : लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? फायदे, तोटे आणि उपाय
३. चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट देखील वापरू शकता. यासाठी एका ब्रशवर टूथपेस्ट लावून चांदीच्या वस्तू घासा आणि त्यानंतर गरम पाण्याने धुवा. यामुळे चांदीच्या वस्तू स्वच्छ होतील.
आणखी वाचा : तेल जास्त वेळ गरम करणे आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या खाद्यतेल वापरण्याची योग्य पद्धत
४. चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी, एक कप व्हिनेगरमध्ये एक चमचा मीठ घाला आणि त्याचे मिश्रण तयार करा. चांदीवर १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.