Cleaning Tips : आपल्यापैकी अनेकजणांना घर स्वच्छ ठेवायला आवडते. झाडू लावणे, फरशी पुसणे, किचन स्वच्छ ठेवणे, इत्यादी. आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा भाग आहे. इतर गोष्टींच्या तुलनेत आपण बाथरुम मात्र दररोज नाही तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्वच्छ करतो त्यामुळे अनेकदा बाथरुमच्या टाइल्सवर पिवळटपणा दिसून येतो पण हेल्दी लाइफस्टाइलसाठी बाथरुमची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये बाथरुमचा पिवळटपणा कसा दूर करायचा याविषयी सांगणार आहोत.

बाथरुमच्या टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणताही दहा रुपयांचा साधारण साबण विकत आणा. या साबणाचे बारीक बारीक तुकडे करावेत. हे तुकडे एका बॉटलमध्ये पाणी टाकून मिक्स करावे. जेव्हा साबणाचे तुकडे पाण्यात विरघळेल तेव्हा हे साबणाचे लिक्विट टाइल्सवर टाकावे आणि स्क्रबरनी चांगल्याने घासावे. या सोपी उपायाने टाइल्सचा पिवळटपणा दूर होणार.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स

हेही वाचा : How to Clean Laptop Screen : लॅपटॉप कसा स्वच्छ करावा? ‘या’ टिप्स वापरुन पाहा, दिसेल अगदी नव्यासारखा

टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दहा रुपयाच्या व्हिनेगरचाही वापर करू शकता. यासाठी व्हिनेगरला गरम पाण्यात मिक्स करावे. हे पाणी टाइल्सवर टाकून स्क्रबनी घासावे. ही ट्रिक वापरल्याने टाइल्स नव्यासारखी दिसेल.

जर टाइल्सवर खूप जास्त चिकटपणा किंवा अस्वच्छता असेल तर मीठाचा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. बाथरुम स्वच्छ करण्याच्या आदल्या रात्री बाथरुमध्ये मीठ टाकावे आणि रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्क्रबरनी टाइल्स चांगल्या घासाव्यात. या बेस्ट ट्रिकने टाइल्सचा पिवळटपणा दूर होणार.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)