How To Clean Plastic Chairs At Home: अनेकांच्या घरात प्लास्टिकच्या खुर्च्या वापरल्या जातात. त्या हलक्या असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणेदेखील सोपे असते. त्यामुळे प्लास्टिकच्या खुर्च्यांचा सर्रास वापर केला जातो. मात्र, सतत वापरल्यानंतर या खुर्च्या बऱ्याच अस्वच्छ वा खराब दिसू लागतात. अनेकदा खुर्च्या सतत धुऊनही त्यांचा काळपटपणा दूर होत नाही. अशा वेळी घरच्या घरी छोट्या उपायाने खुर्च्या स्वच्छ कशा कराव्यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्लास्टिकची खुर्ची अशी करा स्वच्छ

बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मदतीने तुम्ही घरातील मळकटलेली खुर्ची स्वच्छ करू शकता. सर्वप्रथम बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. आता ते खुर्चीवर लावा आणि स्पंजच्या मदतीने हलक्या हाताने स्वच्छ करा. तुम्ही ती कोरड्या कपड्यानेही पुसू शकता किंवा उन्हात ठेवून वाळवा.

तसेच लिंबू आणि मीठ यांच्या मदतीनेही तुम्ही पांढरी खुर्ची नव्यासारखी चमकवू शकता. त्यासाठी लिंबू अर्धे कापून घ्या आणि ते मिठात बुडवा. आता ते लिंबू खुर्चीवरील डागांवर घासून घ्या. त्यानंतर १० ते १५ मिनिटे ती खुर्ची तशीच राहू द्या. आता ती स्वच्छ पाण्याने धुवा.

हेही वाचा: मजबूत, चमकदार केस हवेत? मग दररोज ‘ही’ दोन योगासने न चुकता करा

तुम्ही डिटर्जंट आणि गरम पाण्यानेही खुर्ची स्वच्छ करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम पाणी गरम करून घ्या. आपण डिटर्जंट आणि गरम पाण्याने खुर्ची स्वच्छ करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम पाणी गरम करून, त्यात डिटर्जंट मिसळून पेस्ट तयार करा. आता ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीने खुर्ची व्यवस्थित स्वच्छ करा आणि शेवटी ती पाण्याने धुऊन घ्या.