Kitchen Jugaad: अलीकडे सोशल मीडियावर मॉडर्न किचनची अनेक डिझाइन्स व्हायरल होत असतात. विशेषतः लहानसं किचन असलं तरी तुम्ही खूप हुशारीने वस्तू निवडून तुमच्या किचनला कसं सजवायला हवं हे ही या व्हिडीओजमधून समजतं. पण किचन सजवणं हे जितकं आनंद देणारं ठरतं त्यापेक्षा तिप्पट मेहनत हे सजवलेलं किचन तितकं सुंदर टिकवून ठेवण्यात लागते. अगदी रोजच्या तेल फोडणीच्या वेळी सुद्धा कधी मसाले, कधी वाफा, तेलाचे शिंतोडे त्यात गरम पाणी किंवा भात शिजवताना हवेत पसरणारा दमट ओलसरपणा यामुळे किचनची अगदी दशा होते. तुमच्याही घरातील लाद्या, टाईल्स, किचनच्या खिडक्या यामुळे डागाळलेल्या असतील तर आज आपण त्यावर चार सोपे उपाय पाहणार आहोत…
रोजच्या रोज आपण किचन ओटा स्वच्छ करता असाल तरी किचनच्या टाईल्स रोज स्वच्छ करणे शक्य होत नाही. अशावेळी पडलेलले डाग आणखी चिकट होऊ लागतात. मग आपण हे चिवट डाग काढण्यासाठी काय करू शकता हे जाणून घेऊया…
१) पहिला उपाय म्हणजे खड्यांचं मीठ. थोडं जाड मीठ तुम्ही टाईल्सवर चोळून पाहा यामुळे आपण त्वचा जशी स्क्रब करतो तशा टाईल्स सुद्धा स्वच्छ करता येतील. फक्त मीठ चोळून घासून टाईल्स स्वच्छ केल्यावर दोन वेळा तर पाण्याने स्वच्छ पुसून काढा. अन्यथा मिठामुळे टाईल्सवर ओलसरपणा राहू शकतो.
२) बेकिंग सोडा हा किचन मधील अर्ध्याहून अधिक त्रासांवर एक सोपा, स्वस्त व सहज उपाय आहे. यामुळे तुम्ही चक्क बेकिंग सोडा व व्हिनेगरची पेस्ट करून टाईल्सला लावून घ्या. काहीच मिनिटात तुम्हाला चिकट डाग नरम पडताना दिसतील आणि मग सहज तुम्ही ओल्या फडक्याने टाईल्स पुसून काढू शकता.
३) टूथब्रश वापरून सुद्धा तुम्ही किचनच्या टाईल्स लख्ख करू शकता. खरंतर तुम्ही साध्या डिटर्जंट किंवा साबणाने घासून जेव्हा टाईल्स स्वच्छ करायला जाता तेव्हा तारेचे स्क्रब वापरू शकत नाही कारण साहजिकच यामुळे टाइल्सवर चरे पडतात. अशावेळी विशेषतः दोन टाईल्सच्या मधली फट स्वच्छ करण्यासाठी बारीक टूथब्रशन कामी येऊ शकतो.
४) आणि चौथा उपाय म्हणजे आपली आजची स्टार टीप अशी आहे की तुम्ही तुमचा केस सुकवायचा मित्र (हेअर ड्रायर) वापरून तुम्ही डाग हलके करू शकता. यासाठी तुम्हला सर्वात आधी मऊ, पातळ कापड किंवा कागद टाईल्सवर लावायचा आहे. आणि मग यावर हेअर ड्रायर सुरु करून गरम हवेने दोन तीन मिनिट ड्रायर फिरवून घ्यायचा आहे. अधिक चांगल्या रिझल्टसाठी पाणी स्प्रे करून मग ड्रायर फिरवा जेणेकरून डाग सहज निघतील.
हे ही वाचा<< न फोडता, एका सेकंदात, नारळ आतून कुजलाय की ताजा आहे, कसं ओळखायचं? ‘या’ ५ हॅक्सने वाचवा पैसे
तुम्हीही हे उपाय करून पाहा आणि कसे रिझल्ट येतात हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.