घर स्वच्छ करताना अनेकदा आपण खिडक्यांची स्वच्छता दररोज करीत नाही. अशा वेळी खिडक्यांच्या काचांवर धुळीचे थर साचत जातात आणि काचा खराब होतात. मग अनेक उपायांनीही काही उपयोग होत नाही. पण, आज आम्ही तुम्हाला काही ‘हटके उपाय’ सांगणार आहोत. फक्त पाच रुपये खर्च करून या उपायांद्वारे तुम्ही खिडक्यांच्या काचा नव्यासारख्या चमकवू शकता.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर आपण विशेषत: स्वयंपाकघरात करतो; पण तुम्हाला माहिती आहे का बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही खिडक्यांच्या काचाही स्वच्छ करू शकता. सुरुवातीला बेकिंग सोडा मऊ कापडावर लावून, त्याने काचेवर घासा. त्यानंतर सुती कापड आणि पाण्याच्या मदतीने खिडक्या स्वच्छ करा.

suspense thriller movies on ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
Viral video of a young man puts fire cracker between legs Diwali crackers stunt video went viral on social media
VIDEO: पायांच्या मधोमध ठेवला फटाका अन्…, तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून व्हाल थक्क
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
thieves stole jewellery from different parts of pune during diwali
लक्ष्मीपूजनाला सदनिकेतून दागिने लंपास- वारजे, लोणी काळभोर भागातील घटना

हेही वाचा : फक्त 10 रुपयांमध्ये दूर करा बाथरुमचा पिवळटपणा, काचेसारखी चमकतील टाइल्स

व्हिनेगर

एका स्प्रेच्या बाटलीमध्ये व्हिनेगर भरा आणि खिडकीवर स्प्रे करा. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.

डिश सोप लिक्विड

स्वयंपाकघरातील भांडी आपण कित्येकदा ‘डिश सोप लिक्विड’ने स्वच्छ करतो. पण, तुम्हाला खिडक्यांच्या खराब काचा स्वच्छ करायच्या असतील, तर तुम्ही हा भांडी घासण्याचा द्रवरूपी साबण वापरू शकता. त्यासाठी ‘डिश सोप लिक्विड’ आणि थोडे पाणी एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरा. त्यानंतर खिडक्यांवर हा स्प्रे मारा आणि स्वच्छ कपड्याने पुसा.

हेही वाचा : How to Clean Laptop Screen : लॅपटॉप कसा स्वच्छ करावा? ‘या’ टिप्स वापरुन पाहा, दिसेल अगदी नव्यासारखा

मीठ

मीठ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही; तर ते काचांची चकाकीही वाढवू शकते. त्यासाठी पाण्यात थोडे मीठ मिसळा. हे मिश्रण काचांवर लावा आणि मग कपड्याने काचा नीट पुसून घ्या.