सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही कारणासाठी आपल्या जवळच्या मंडळींना घरी बोलावून, त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालून रात्रभर पार्टी करायची मजाच काही और असते. एकमेकांची गप्पा मारत, आपण वेगवेगळी पेयं पितो, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आनंद घेत असतो. पार्टीसाठी सजावट, तयारी, बोलावणी करणे वगैरे सगळं सहज होऊन जातं. पण पार्टीनंतर मात्र सबंध घरात आणि स्वयंपाकघरात जो काही पसाऱ्याचा ढीग जमा होतो, तो बघूनच अंगावर काटा येतो.

घरात बोलावलेल्या मंडळींसाठी काही खास पदार्थ बनवले असतील, तर खाण्यासाठी वापरलेल्या ताट-वाटी, प्लास्टिकचे कप, चमचे, बाटल्या अशी सर्व भांडी ओट्यावर अस्ताव्यस्त पसरलेली असतात. पार्टीनंतरचं हे दृश्य बघून, ‘हा सगळा पसाऱ्याचा डोंगर कसा आवरणार’ असा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल ना? पण, काळजी करू नका. यावर काही सोपे उपाय आहेत ते पाहा.

Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

पार्टीनंतर स्वयंपाकघर स्वच्छ करण्याच्या पाच टिप्स

१. पसारा आवरायची रूपरेषा ठरवा

घरातील सर्व पाहुणे-मंडळी निघून गेल्यानंतर पसारा आवरण्याची घाई करू नका. त्याऐवजी १०-१५ मिनिटे स्वस्थ बसून, आवरावर करण्याची रूपरेषा तयार करा. त्यामध्ये घरच्या साफसफाईला सुरुवात कुठून करायची हे ठरवून मग एक-एक करीत घर आणि स्वयंपाकघर साफ करा. त्यामुळे तुमचा अजिबात गोंधळ उडणार नाही.

२. वस्तूंचे प्रकार वेगळे करा

स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या वस्तू असतात. त्यामुळे ते ठरावीक क्रमाने आवरल्यास काम सोपे होते. टाकून देण्याच्या वस्तू जसे की, प्लास्टिकचे चमचे, कप, फॉइलच्या ताटल्या यांसारख्या गोष्टी वेगळ्या करा. काचेच्या वस्तू आणि नेहमीच्या वापरातल्या वस्तू वेगळ्या करून त्या स्वच्छ करा.

हेही वाचा : काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते? किचनमध्ये उरलेल्या पोळीपासून बनवा मुंबई स्टाईल व्हेज फ्रँकी; पाहा रेसिपी….

३. कचरा गोळा करण्यासाठी पिशव्यांचा वापर

पार्टीनंतर तुम्हाला बराच कचरा गोळा करावा लागतो. त्यात तो ओला किंवा सुका कचरा असू शकतो. त्यामुळे कचरा गोळा करताना तो एकाच पिशवीत सर्व काही न भरता, प्रत्येक प्रकारचा कचरा वेगळा वेगवेगळा भरा. त्यासाठी थोड्या जास्त पिशव्या किंवा डब्यांचा वापर करा.

४. फ्रिज रिकामा हवा

घरात पार्टी ठेवली की, आपण कुणाला काही कमी पडू नये म्हणून थोडे जास्त अन्नपदार्थ आणतो किंवा बनवतो. आता सर्व काही खाऊन झाल्यानंतर उरलेले अन्न आपण पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी देतो किंवा आपल्या घरी फ्रिजमध्ये ठेवतो. अशा वेळेस हे अन्नपदार्थ छोट्या डब्यात, भांड्यांमध्ये काढून घेऊन फ्रिजमध्ये ठेवणे सोईचे जाते. घरी पाहुणेमंडळी येण्याआधीच जर तुम्ही फ्रिजमध्ये थोडी जागा करून ठेवलीत, तर त्यानेही तुमचा नंतरचा आवराआवरीचा वेळ वाचण्यास मदत होईल.

५. सगळी स्वच्छता शेवटी नको

पार्टीदरम्यान बरेचदा, पेय किंवा पदार्थ हातातून चुकून सांडतात. अशा सांडलेल्या गोष्टी जर तुम्ही लगेच साफ केल्या नाहीत, तर त्यांचे चिवट डाग तसेच राहतील. खासकरून सोफा, चादर आणि जमिनीवर गालिचा, कार्पेट असेल, तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. म्हणून गरज पडल्यास पटकन हाताला सापडेल असं कापड किंवा टिशू पेपर यांची तयारी करून ठेवा. असं केल्यानं सर्व कार्यक्रमानंतर घर आवरताना जास्तीचे कष्ट पडणार नाहीत आणि पदार्थांचे डागदेखील राहणार नाहीत.

आता या साफसफाईच्या अतिशय सोप्या आणि उपयुक्त टिप्सचा वापर तुमच्या पुढच्या पार्टीसाठी नक्की करून पाहा.