How to clean Comb : कंगवा केस विचरण्यासाठी आपण नियमित वापरतो. तुम्हाला लक्षात येईल की नियमित वापरल्यानंतर काही दिवसानंतर कंगवामध्ये मळ साचतो. कंगवाचे दात रुंद असतात. त्यात साचलेला मळ बाहेर काढणे कठीण जाते.
सोशल मीडियावर कंगवा स्वच्छ कसा करायचा, याविषयी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.युट्यूबवरील एका व्हिडीओत सुद्धा अशीच एक सोपी ट्रिक सांगितली आहे.
खराब कंगवा कसा स्वच्छ करावा
या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –
सुरुवातीला खराब कंगवा एका भांड्यामध्ये ठेवावा. त्यावर गरम पाणी टाकावे आणि त्यानंतर त्यात कोणतेही डिटर्जंट पावडर टाकावे.त्यानंतर हे डिटर्जंट पावडर पाण्यात चांगले एकजीव करावे. तुम्ही त्यात थोडा अँटी-डँड्रफ शाम्पू सुद्धा टाकू शकता. त्यानंतर त्यात तुम्ही लिंबाचा रस टाका. अर्धा तास कंगवा या गरम पाण्यात असाच ठेवावा. त्यानंतर जुन्या टूशब्रशनी तुम्ही कंगवा स्वच्छ करावा. कंगव्यातील मळ निघून जाईल आणि कंगवा नव्यासारखा दिसेल.ही एक चांगली ट्रिक असून याच्या मदतीने तुम्ही खराब कंगवा स्वच्छ करू शकता.
हेही वाचा : Saree Hacks : रबर बँडच्या मदतीने करा परफेरक्ट साडीच्या निऱ्या; अनोखा जुगाड, पाहा VIDEO
Joyful Bakes या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी ही ट्रिक वापरुन कंगवा स्वच्छ केला आहे. अनेक युजर्सना हा घरगुती सोपी उपाय आवडला आहे.