Cleaning Hacks : तुमच्यापैकी अनेक जण ऑफिसला प्लास्टिकच्या टिफिन बॉक्समधून जेवण घेत जात असाल; पण हे टिफिन बॉक्स अर्थात प्लास्टिकचे डबे रोज वापरल्यानंतर काही दिवसांनी तेलकट व चिकट वाटू लागतात. त्यावर व आतही जेवणातील हळद, मसाल्याचे पिवळसर डाग दिसू लागतात. त्यामुळे असे पिवळसर झालेले डबे वापरतानाही लाजिरवाणे वाटते.
अशा वेळी अनेक उपाय करूनही प्लास्टिकच्या डब्यांतील हे डाग, दुर्गंधी काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला प्लास्टिकच्या डब्यांतील पिवळसर, चिकट व तेलकट डाग घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही प्लास्टिकचे डबे न घासता चकाचक करू शकता.
प्लास्टिकचे डबे स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स
१) पेपर टॉवेल, पाणी आणि लिक्विड सोप
प्लास्टिकचे डबे न घासता चमकवण्यासाठी तुम्हाला पाणी, लिक्विड सोप व पेपर टॉवेलची गरज लागेल.
१) सध्या सोशल मीडियावर प्लास्टिकचे डब्यांमधील पिवळसरपणा न घासता दूर करण्यासाठी एक ट्रिक व्हायरल होत आहे.
२) या ट्रिकनुसार सर्वप्रथम तुम्ही एक पेपर टॉवेलचा तुकडा घ्या.
३) तो डब्याच्या आकारानुसार कापून घ्या. आता डब्यामध्ये पुरेसे पाणी भरा; जेणेकरून पेपर टॉवेल त्यात बुडेल.
४) त्यानंतर त्या पाण्यात लिक्विड सोप मिसळा.
५) त्यानंतर डब्याचे झाकण बंद करा आणि काही वेळ तसेच राहू द्या. मग डबा चांगला शेक करा.
६) आता डबा १० मिनिटे तसाच ठेवा.
७) नंतर डबा डिटर्जंट आणि गरम पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा.
बेकिंग सोडा, लिक्विड सोप
१) तुम्ही बेकिंग सोड्याच्या मदतीनेही प्लास्टिकच्या डब्यातील पिवळसर डाग, तेलकटपणा स्वच्छ करू शकता.
२) त्यासाठी बेकिंग सोडा डब्यामध्ये टाका आणि काही तास डबा तसाच झाकून ठेवा.
३) त्यानंतर डब्यात थोडा लिक्विड सोप मिसळा आणि स्क्रब करा. त्यामुळे प्लास्टिकचे डबे एकदम चकाचक होतील.
व्हिनेगर, डिटर्जंट पावडर आणि कोमट पाणी
१) तुम्ही पिवळसर झालेले प्लास्टिकचे डबे व्हिनेगर, डिटर्जंट पावडर आणि कोमट पाण्यानेही स्वच्छ करू शकता.
२) यासाठी प्लास्टिकच्या डब्ब्यात व्हिनेगर टाका काही मिनिटे तसचं ठेवा, यानंतर त्यात थोडी डिटर्जंट पावडर मिक्स करुन कोमट पाणी टाका आणि स्वच्छ करा, अशाप्रकारे प्लास्टिकचे डब्ब्यातील सर्व डाग आणि घाण निघून जाईल.