Cleaning Tips: लादी पुसणे हे काम काहींना दहा वेळा आठवण करूनही पूर्ण होत नाही तर काहींनी दहा वेळा लादी पुसली तरी ती पुरेशी वाटत नाही. या दोन्ही पद्धती घातक आहेत. तुम्ही म्हणाल लादी पुसली नाही तर अस्वच्छतेचा धोका समजू शकतो पण लादी पुसली तर काय नुकसान होणार आहे. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही गरजेपेक्षा अधिक पुसलीत तर त्याचा काही वेळा उलटच परिणाम होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण दिवसातून नेमकी किती वेळा व कशी लादी पुसली गेली पाहिजे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया..
लादी किती वेळा पुसणे गरजेचे?
अर्थात, लादी पुसण्यासाठी काही कोणतं नियमांचं पुस्तक नाही. पण तुम्ही कोणत्या प्रकारची लादी पुसत आहात आणि तुम्ही राहत असलेल्या घराचा आकार लक्षात घेणे गरजेचे आहे. तज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदा संपूर्ण लादी नीट घासून पुसून स्वच्छ करणे हे सर्वोत्तम आहे. खोली साफ करणे ही जवळजवळ कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. कितीही टाळलं तरी धूळ, माती, घाण नेहमी घरात प्रवेश करते, अशावेळी विशेषत: घराचे प्रवेशद्वार, स्वयंपाकघर, बाथरूम दर आठवड्याला नीट स्वच्छ करणे आवश्यक आहे. पण अर्थातच, जर तुमच्याकडे पाळीव प्राणी किंवा लहान मुले असतीलतर हे काम वारंवार करावे लागेल.
तुम्ही जर वारंवार लादी पुसत असाल तर घरातील फरशीवर धूळ व माती पाण्यात मिसळून थर तयार होऊ शकतो. शिवाय पाण्याचे डागही पडू शकतात. जर घरात लाकडी फ्लोरिंग किंवा कार्पेट असेल तर ते खराब होण्याची सुद्धा शक्यता असते.
हे ही वाचा<< अंतर्वस्त्र निवडताना ‘Period Panties’ ला महिला देतायत प्राधान्य; कसा करायचा वापर? जाणून घ्या फायदे
लादी पुसताना टाळा ‘या’ २ चुका
लादी पुसताना सर्वात आधी कचरा काढून टाका, जितकी धूळ, माती तुम्हाला झाडूने काढून टाकता येईल तितके उत्तम. दुसरी बाब म्हणजे खूप पाणी वापरणे. जर तुमचा मॉप खूप ओला असेल तर तुम्ही तो नीट पिळून ७० टक्के कोरडा करून वापरायला हवा. जर लादी पुसताना १० मिनिटानंतर ओल कायम असेल तर समजून जा तुम्ही खूप पाणी वापरलेले आहे.