Cleaning hack : विकेंड किंवा सुट्टीचा दिवस म्हणजे घरातील साफसफाई करायचा दिवस, असा ऑफिसला जाणाऱ्या मंडळींचा अलिखित नियम झाला आहे. आठवडाभर काम करताना घरातील स्वच्छतेकडे हवे तितके लक्ष दिले जातात नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घरातील पंखे साफ करणे, संपूर्ण घर झाडून घेणे किंवा स्वयंपाकघरातील जुन्या वस्तूंची, डब्यांची स्वछता अशी बरीच कामं असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यापैकी जुने, धुळीने माखलेले आणि चिवट डाग असणारे स्टीलचे डबे अगदी पाच मिनिटांमध्ये स्वच्छ कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत. जुने झालेले तसेच धूळखात पडलेल्या डब्यांना पुन्हा कसे चकचकीत करायचे याबद्दल अत्यंत सोपी आणि उपयुक्त टीप युट्युबवरील Puneri tadka नावाच्या चॅनलने व्हिडीओमार्फत शेअर केली आहे. त्याप्रमाणे जुने डबे कसे स्वच्छ करायचे ते पाहा.

हेही वाचा : Cleaning hack : पंखा आणि फरशी दोन्ही राहतील साफ! ‘ही’ वस्तू वापरून करा हीअशी जादू

जुने स्टीलचे डबे चमकविण्याची ट्रिक पाहा :

साहित्य

बेकिंग/खायचा सोडा
लिंबू सत्त्व किंवा लिंबाचा रस
पाणी
मऊ स्पंज
तारेची घासणी
साबण

कृती

  • एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा बाउलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा घ्या.
  • त्यामध्ये एक चमचा लिंबू सत्त्व किंवा लिंबाचा रस घालून घ्या.
  • सर्वात शेवटी दोन ते तीन चमचे पाणी या मिश्रणात घालून घ्यावे.
  • पाणी घातल्यावर सोडा फसफसून वर आला, म्हणजे आपले डबे घासायचे मिश्रण तयार झाले आहे, असे म्हणू शकतो.

हेही वाचा : Cleaning hack : केवळ २० रुपयांमध्ये बाथरूममधील नळ होतील चकाचक! केवळ ‘ही’ वस्तू वापरून करा सोपा जुगाड

  • आता एका मऊ स्पंजच्या मदतीने तयार केलेले मिश्रण डब्यांवर, डब्याच्या झाकणावर हलक्या हाताने लावून घ्या.
  • मिश्रण डबा व झाकण यांना आतून आणि बाहेरून व्यवस्थित लावून घ्यावे.
  • डब्याला बेकिंग सोडायचे मिश्रण लावून ते पाच मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या.
  • पाच मिनिटे झाल्यांतर, त्या डब्याला कपडे घासायच्या किंवा भांडी घासायच्या साबणाने घासून घ्यावे.
  • यासाठी, गरज असल्यास तुम्ही तारेच्या घासणीचा वापर करू शकता.
  • डब्यावर असणारे चिवट आणि चिकट डाग तारेच्या घासणीने घासून घ्या.
  • तुम्ही तयार केलेले मिश्रण डब्यावर लावल्याने, असे डाग अगदी सहज काढता येऊ शकतात.
  • डबा नीट घासून घेतल्यानंतर डब्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.
  • डब्यावरील मिश्रण आणि साबण निघून जाईपर्यंत डबा पाण्याने स्वच्छ करावा.
  • डबा धुतल्यानंतर तुम्हाला तो व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी नव्यासारखा आणि चकचकीत दिसण्यास मदत होईल.
  • तसेच त्यावरील सर्व डाग काढण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
  • तुम्ही या बेकिंग किंवा खायच्या सोड्याच्या मिश्रणाचा वापर कोणतीही स्टीलची भांडी चमकावण्यासाठी करू शकता. असे व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा : Bathroom tips : आंघोळीच्या प्लास्टिक, स्टीलच्या बादल्या कशा ठेवाल स्वच्छ? जाणून घ्या ‘या’ दोन टिप्स

युट्युबवरील Puneri tadka नावाच्या चॅनलवरून हा जुने डबे घासण्यासाठी एकदम सोपी ट्रिक व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleaning tips how to clean old and sticky steel containers at home use this amazing hack check out dha
Show comments