तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही लोकं सकाळी आणि संध्याकाळी दोनदा फरशी पुसतात. कारण एकदा साफ केल्यानंतर त्यांची फरशी पुन्हा खराब होते. अशावेळी फरशी साफ करताना पाण्यात अशा काही गोष्टी मिसळल्या पाहिजेत ज्यामुळे फरशी पुन्हा खराब होणार नाही. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ५ गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर फरशी पुसताना केल्यास तुम्हाला फरशी पुन्हा पुन्हा पुसण्याची गरज भासणार नाही. तसंच फरशी पुसताना पाण्यात या गोष्टी मिसळल्यास संपुर्ण घर देखील चमकदार बनेल.
फरशी पुसताना पाण्यात काय मिसळावे?
बेकिंग सोडा
जर तुम्ही फरशी पुसताना पाण्यात बेकिंग सोडा मिसळल्यास तर यामुळे तुमचे घर फक्त स्वच्छ होत नाही तर यामुळे फरशीवर आढळणारे बॅक्टेरिया देखील साफ होतात.
व्हिनेगर
जर तुम्ही पाण्यात व्हिनेगर मिसळतात तर यामुळे फरशीवर आढळणारे पिवळे डाग दूर होतात. तसंच काळेपणाची समस्याही दूर होते. व्हिनेगर असलेले पाणी हे अॅसिडिक असते, जे केवळ फरशीच चमकवत नाही तर घाण काढण्यासाठीही खूप उपयोगी ठरू शकते.
लिंबूचा रस
फरशी पुसताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्यास तुमचे घर एकदम चमकून जाईल. लिंबाचा रस स्वच्छतेसोबतच हट्टी डाग दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही लिंबाचा रस वापरून फरशी स्वच्छ करू शकता.
( हे ही वाचा; हिमालय पर्वतावरून एकही विमान का उडत नाही? यामागील कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)
बोरेक्स पावडर
फरशी पुसताना पाण्यात बोरेक्स पावडर घातल्यास तुमचे घर स्वच्छ होऊन जाईल. बोरॅक्स पावडरचा उपयोग फरशी पॉलिश करण्यासाठी होतो. तसंच यामुळे फरशीवर असणारे पिवळे डाग देखील दूर होतात.
डिटर्जंट पावडर
तुम्ही पाण्यात डिटर्जंट घालून देखील फरशी साफ करू शकता. यामुळे फक्त फरशी साफ होत नाही तर डाग देखील दूर होतात. मात्र लक्षात ठेवा की डिटर्जंटचा वापर जास्त करू नका, त्यामुळे जमिनीवर डाग राहू शकतात.