Cleaning tips : उन्हाळ्यात बाहेर जाताना आपण नेहमी पाण्याची बाटली घेऊन जातो. कारण ऊन इतकं कडक असते त्यामुळे शरीराला खूप घाम येतो ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते परिणामी निर्जलीकरणाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळावे यासाठी बाहेर जाताना लोक पाण्याची बाटली नेहमी घेऊन जातात. अशामध्ये नेहमी वापर केल्यामुळे पाण्याच्या बाटलीच्या तळाला घाण साचू शकते पण बाटली निमुळती असल्यामुळे व्यवस्थित साफ करता येत नाही. बाटली साफ करणे जरा किचकट काम होऊन जाते म्हणून आज आम्ही तुम्हाला काही सोपी पद्धत सांगणार आहोत जी बाटली स्वच्छ करण्यासाठी उपयूक्त ठरू शकतात आणि तुम्हाला स्वच्छ बाटली वापरता येऊ शकते.
अशी करावी पाण्याची बाटली साफ
जर तुम्हाला पाण्याची बाटली साफ करायची असेल तर मग एक ग्लास गरम पाण्यामध्ये काही थेंब डिश वॉश लिक्विड सोप टाकून बाटलीमध्ये ओता. मग बाटली माग -पुढे जोरात हलवा आणि ५ मिनिटांसाठी तसेच राहू द्या. त्यानंतर तुम्ही बाटलीची ब्रशच्या मदतीने सफाई करा. त्यानंतर बाटलीचे झाकणदेखील ब्रशच्या मदतीने साफ करुन घ्या. स्वच्छ पाणी टाकून सर्व घाण बाहेर काढून टाका. पुन्हा गरम पाणी टाकून बाटली साफ करा. त्यामुळे बाटलीमध्ये साचलेली घाण निघून जाईल आणि जंतूदेखील मरून जातील. आता बाटली उन्हात ठेवून सुकवा.
हेही वाचा – डोळ्यांखालील काळ्या डागांमुळे वैतागला आहात का? ‘हे’ सोपे घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर
तुम्ही बाटलीमध्ये ब्लीच टाकून व्यवस्थित धूवू शकता.
आता बाटलीमध्ये पाणी आणि ब्लिच पावडर टाकून जोराज हलवा करू शकता. पुन्हा रात्रभर तसेच राहू द्या. आता सकाळी ब्रशच्या मदतीने घासून साफ करा. त्यामुळे बाटली व्यवस्थित साफ होईल. तुम्ही व्हिनेगरच्या मदतीनेदेखील बाटली साफ करु शकता.