Cloves water Benefits : किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. अनेक मसाल्यांना औषधींचा भांडार मानले जाते. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचनमधील गरम मसाल्यातील असाच एक पदार्थ म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तरी त्याचे फायदे भरपूर आहेत. परंतु, केवळ संपूर्ण लवंगाच नाही तर त्यांचे पाणीदेखील तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकते. तुम्हाला माहितीये का झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी प्यायल्यास काय होते? चला जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवंग पाण्याचे फायदे | झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिण्याचे पाच फायदे

१. पचनाला चालना देते : अनेकांना रात्रीच्या वेळी पोट फुगणे आणि गॅस यांसारख्या पाचक समस्या येतात. तुम्हालाही अशाच समस्या येत असल्यास, लवंगाचे पाणी पिणे हे पाचन समस्यांसाठी गेम चेंजर ठरू शकते. जर्नल ऑफ फार्माकोग्नोसी आणि फायटोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लवंग अतिसार आणि जठरासंबंधी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. ते पचनास मदत करतात.

२. रोगप्रतिकारशक्ती वाढवते : तुम्ही वारंवार आजारी पडतात का? तसे असल्यास, हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकते. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही लवंगासारख्या मसाल्यांवर अवलंबून राहू शकता. लवंगात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्याने, त्यांचे पाणी हानिकारक संक्रमणांशी लढण्याची तुमची क्षमता सुधारू शकते. तुम्ही झोपता तेव्हा लवंगाचे पाणी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करेल.

३. आराम करण्यास मदत करते : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, लवंगात युजेनॉल नावाचे संयुग असते, जे तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी ओळखले जाते. झोपायच्या आधी लवंगाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि रात्री चांगली झोप मिळेल. अधिक आरामदायी बनवण्यासाठी तुम्ही ते पाणी किंचित गरम करू शकता.

४. तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : लवंग तोंडाच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदेदेखील देतात. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म लवंगामध्ये असतो, ज्यामुळे तोंडात हानिकारक जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत होते. वेगवेगळ्या कारणांनी तोंडाला दुर्गंधी येते, त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, केवळ लवंगेच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

५. यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर : लवंगाचे पाणी प्यायल्याने तुमच्या यकृताला फायदा होतो. लवंगात आढळणारे युजेनॉल यकृताला दुखापतीपासून वाचवू शकते. याव्यतिरिक्त ते जळजळ आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला यकृताच्या समस्या येत असल्यास, झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी प्या.

गर्भवती स्त्रिया, यकृताचा आजार असलेल्या व्यक्ती व रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्यांनी लवंगेचे सेवन सावधपणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावे.