Cluster Beans is very beneficial: आरोग्यासाठी सर्वच भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. डॉक्टरही आहारात जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा सल्ला देतात. भाज्या केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठीही मदत करतात. भारतीय आहारात अनेक विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचाही समावेश केला जातो. त्यामध्ये विविध चवीच्या भाज्या आहेत. ज्यात कारलं, मेथी, भेंडी, गवार, तोंडली अशा विविध चवीच्या भाज्या आहेत. मात्र, कारल्याव्यतिरिक्त अनेक जण गवारीच्या भाजीचं नाव जरी ऐकलं तरी नाक-तोंड मुरडतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का गवारीची भाजी खाण्याचे अनेक जबरदस्त फायदे आहेत.

गवारीची भाजी हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच ही भाजी ए, बी, सी व के ही जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात प्रदान करते. त्यात कॅल्शियम, आयर्न व पोटॅशियम हे उपयुक्त घटकदेखील आढळतात.

Coffee in the morning is best for heart health says stud Can this routine work for you
सकाळी उठताच एक कप कॉफी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम! संशोधनाचा निष्कर्ष; तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरेल का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
diabetes and skipping breakfast
मधुमेह झालेल्यांनी सकाळचा नाश्ता न केल्यास गंभीर आरोग्य…
Benefits of Grains in Diet in Marathi
ज्वारी, बाजरी, नाचणी खा आणि चांगलं आरोग्य कमवा
Maharashtra traditional jewellery
कोल्हापूरी साज ते बकुळीहार; तुमच्याकडे यापैकी कोणते महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिने आहेत?
Investigation and tips for keeping house helper in home in marathi
घरकामासाठी मोलकरीण, मदतनीस ठेवण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी! ज्यामुळे घर, कुटुंब राहील सुरक्षित
cockroaches how to get rid of cockroaches by using home remedy rice helps to remove cockroaches jugaad
झुरळांचा त्रास आता कायमचा होईल गायब! ‘रात्रीचा भात’ वापरून होईल कमाल, पाहा जुगाडू उपाय
Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Hack to remove coconut from its shell
नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील

गवारीची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे

हाडं मजबूत होतात

गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. तसेच या भाजीच्या सेवनानं हाडांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. या भाजीमध्ये फॉस्फरस असल्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

पचनक्रिया सुधारते

गवारीची भाजी पचनासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीच्या सेवनानं आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते; ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. तसेच ही भाजी पोटातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि पचनासंबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

मधुमेही रुग्णांचे आरोग्य सुधारते

गवारीची भाजी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गवारीच्या भाजीच्या सेवनानं रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्यानं चढ-उतार होत नाही, त्यामुळे मधुमेहींसाठी गवारीची भाजी खाणं फायदेशीर आहे.

हृदयासाठी फायदेशीर

गवारीची भाजी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम असल्यामुळे हृदयाच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

गवारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात, जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत गवारीच्या भाजीचे सेवन त्यांना फायदेशीर ठरू शकते.

महिलांसाठी फायदेशीर

गवारीच्या भाजीचे सेवन मासिक पाळीमध्ये खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीमध्ये होणारा त्रास यामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

तणाव दूर होतो

गवारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात, जे चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. गवारीच्या भाजीमुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळण्यास मदत होते.

Story img Loader