तज्ज्ञांच्या मते, क्लस्टर डोकेदुखीची प्रकरणे मायग्रेन किंवा टेन्शन डोकेदुखीच्या तुलनेत खूप कमी पाहायला मिळतात. त्याची सुरुवात कोणत्याही संकेतांविना होते. त्यामुळे ही समस्या किती गंभीर असू शकते, याबाबत प्रारंभी पीडित अनभिज्ञ असतो. ही डोकेदुखी हजारातून एका व्यक्तीस होतो. तसेच, ही तरुणांना होणारी डोकेदुखी आहे. ती सहसा ३० वर्षे पूर्ण होण्याआधी होते. अशा प्रकारची डोकेदुखी बहुतेक पुरुषांनाच होते, मात्र आजकाल महिलाही त्याला अपवाद नाहीत.
क्लस्टर डोकेदुखी ही अचानक होणारी डोकेदुखी आहे, जी दिवसातून अनेकवेळा होऊ शकते. त्यामुळे पीडित व्यक्तीला सुरुवातीला नाक व डोळ्याच्या आसपास जळजळ होऊ शकते. त्यानंतर काही मिनिटांतच वेदना अचानक वाढतात. अनेक वेळा त्या काही मिनिटांतच दूर होतात, मात्र काही वेळा त्या अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा जास्त काळही राहतात. वेदनेची सुरुवात नेहमी डोळे व चेह-याच्या एकाच बाजूने होते. साधारणत: पीडितास वेदनेची जाणीव चेह-याच्या केवळ एकाच बाजूने होते, मात्र अनेकवेळा ही वेदना दुस-या बाजूसही होऊ शकते.
क्लस्टर हेडेकची स्वत:ची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे इतर प्रकारच्या डोकेदुखीपेक्षा तो वेगळा आहे. ही डोकेदुखी अनेकवेळा झोपल्यानंतरही होते. ज्यात डोळ्यांना वेदना होऊन त्यातून पाणी येऊ लागते. यावेळी तो डोळा उघडण्यासही त्रास होतो. पीडिताच्या एका नाकपुडीला पडसे होते. रेड वाइन पिण्याने क्लस्टरचा धोका वाढतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा