Cockroaches removal home remedy: घरात होणाऱ्या झुरळांपासून सगळेच वैतागलेले असतात. दररोज काही ना काही उपाय ट्राय करूनही झुरळ काही घरावरचा हक्क सोडायला मागत नाही. कमी होण्यापेक्षा त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. मग होम रेमेडी, जुगाड, पेस्ट कंट्रोल अशा विविध गोष्टी ट्राय करून आपणच कंटाळतो आणि त्यावर अजून कोणता उपाय करणं सोडून देतो. पण आज आपण असा एक जुगाड जाणून घेणार आहोत, ज्यामुळे झुरळ कायमचं तुमचं घर विसरून जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झुरळं मारण्यासाठी अनेक केमिकलयुक्त पदार्थ बाजारात मिळतात. पण ते पदार्थ वापरणं अनेकांना सुरक्षित वाटत नाही. कारण त्यांचा वास खूप जास्त उग्र असल्याने घरातल्या लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याव्यतिरिक्त नेमकं काय वापरावं हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. चला तर मग जाणून घेऊया, घरच्याच उपायाने आपण झुरळांपासून कायमची सुटका कशी करून घेऊ शकतो.

हेही वाचा… कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…

स्वयंपाकासाठी केलेला भात यावर आपली मदत करू शकतो. अनेकदा जेवून झालं की थोडाफार भात उरतोच. या उरलेल्या भाताचा आपण अनेकदा फोडणीचा भात करतो किंवा याचा वापर वेगळा एखादा पदार्थ बनवण्यात करतो. पण याच भाताच्या साहाय्याने आपण झुरळांना पळवून लावू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर थंड भात लागणार आहे.

झुरळं पळवून लावण्यासाठी भाताचा वापर

झुरळ पळवण्यासाठीचा हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात एक वाटीभर भात घ्या. त्यानंतर त्यामध्ये १ चमचा डिटर्जंट, १ चमचा ब्राऊन शुगर टाका. थोडं पाणी टाकून हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्या. त्यानंतर भाताचे साधारण पेढ्याच्या आकाराचे गोळे करा आणि ते जिथे झुरळं जास्त फिरतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्या.

हेही वाचा… बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर

ब्राऊन शुगरच्या गोड वासामुळे झुरळं भाताकडे आकर्षित होतात. जेव्हा ते हा भात खातात तेव्हा डिटर्जंटमध्ये असणारे उग्र पदार्थ त्यांच्या पोटात जातात आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा प्रकारे घरातल्या झुरळांची संख्या कमी कमी होत जाते. झुरळांना पळवून लावण्यासाठी हा एक अतिशय सोपा आणि सुरक्षित उपाय एकदा नक्की करून पाहा..

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cockroaches how to get rid of cockroaches by using home remedy rice helps to remove cockroaches jugaad dvr