कोरफड हा केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक मानला जातो. या आश्चर्यकारक वनस्पतीमध्ये केस निरोगी ठेवणारे अनेक गुणधर्म आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेसाठी तसेच केसांसाठी आरोग्यदायी मानले जातात. त्याचे मॉइश्चरायझिंग आणि संरक्षणात्मक गुणधर्म एकूण आरोग्यासाठी कमालीचे फायदेशीर ठरू शकतात. खोबऱ्याचं तेल हे चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. खोबऱ्याचं तेल हे चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो. खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेल आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे फेसपॅक तयार करावे. हे फेसपॅक चेहऱ्याला लावावे. नैसर्गिक फेसपॅकमुळे चेहरा उजळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खोबरेल तेल आणि कोरफड हे दोन्ही त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. या दोन्हींचा एकत्रित वापर केल्यास त्यांचा आणखीन चांगला फायदा होतो. ते त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी वापरले जाऊ शकतात. केस आणि त्वचेसाठी खोबरेल तेल आणि कोरफडीचा वापर कसा होतो आणि त्यःचे कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : Beauty Tips: रात्रीच्या वेळेस चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी; चेहऱ्यावर येईल तेज

त्वचेला कोरफडीचे अनेक फायदे होतात. डाग घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वर्षानुवर्षे वापर केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कोरफड आणि खोबरेल तेल एकत्र केले तर ते त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यामुळे पिंपल्स निघून जातात. नियमित वापराने वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होतात.

कसा वापर करावा?

दोन चमचे व्हर्जिन खोबरेल तेलामध्ये सामान प्रमाणात कोरफड जेल मिसळावे. हे दोन्ही पदार्थ चांगल्या प्रकारे मिसळावेत. झोपण्यापूर्वी हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. रात्रभर हे चेहऱ्यावर लावून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

केसांसाठी देखील फायदेशीर

सर्व प्रयत्न करून देखील तुमचे केस निर्जीव आणि कोरडे दिसत असतील तर आणि त्यांची लांबी वाढत नसेल तुम्ही कोरफड आणि खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस गुळगुळीत आणि रेशमी होतात. यासह केस मजबूत होतात आणि त्याच वाढ देखील वेगाने होते.

कसा वापर करावा?

५ चमचे कोरफड जेल आणि ३ चमचे खोबरेल तेल एकत्रित करावे. त्यानंतर त्याची पेस्ट तयार करावी. हे मिश्रण बोटांच्या मदतीने केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावावे.केसांमध्ये मिश्रण चांगले लावून झाल्यानंतर शॉवर कॅपने डोके झाकावे. अर्ध्या तासाने डोके धुवावे. तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. )

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coconut oil aloevera benifits for skin and hairs apply them together beauty tips tmb 01