खोबरतेल मानवी जीवनात उपयोगी समजले जाते. पण, त्याचसोबत हे खोबरतेल तुमचे दात किडण्यापासूनही वाचवू शकते. खोबरेल तेल एक नैसर्गिक प्रतिजैविक (अॅण्टिबायोटिक) म्हणून काम करते आणि दात किडण्यास कारणीभूत असलेल्या साखर आवडणा-या जीवाणूंना नष्ट करू शकते, असे एका नव्या संशोधनातून आढळले आहे. त्यामुळे खोबरेल तेलाचा उपयोग दंतरोगांना आटोक्यात ठेवण्यासाठी होऊ शकेल. तसेच, त्याचा टूथपेस्ट व माउथवॉशमध्ये एक महत्वाचा घटक म्हणून उपयोग होऊ शकेल, असे शास्त्रज्ञांचा म्हणणे आहे.
एन्झिमसोबत खोबरेल तेलाचा वापर केल्यावर दातांमधील साखर आवडणा-या स्ट्रेप्टोकोकस नामक जीवाणूची वाढ रोखली जात असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. त्यामुळे अशा प्रकारे एन्झिमसोबत खोबरेल तेलाचा वापर तोंडाचे आरोग्य राखणा-या उत्पादनांमध्ये रासायनिक घटकांऐवजी करता येण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यातही अतिशय कमी प्रमाणात वापरूनही खोबरेल तेलाचा अपेक्षित परिणाम दिसून आला आहे. आयर्लंडमधील ‘अॅथलोन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे संशोधक डॅमिएन ब्रॅडी यांनी हे संशोधन केले आहे.
संशोधनात विविध तेलांचा वापर स्ट्रेप्टोकॉकस या जीवाणूवर करण्यात आला. त्यापैकी केवळ एन्झिमयुक्त खोबरेल तेलाच्या मिश्रणामुळे विविध जीवाणूंची वाढ रोखण्यात यश आल्याचे दिसून आले. स्ट्रेप्टॉकोकसचाही त्यात समावेश होता. हा जीवाणू दातांवर आम्ल तयार करतो व त्यामुळे दंतक्षयाला सुरुवात होते.
टूथपेस्टपेक्षा खोबरेल तेल बरे
खोबरेल तेलाचा उपयोग दंतरोगांना आटोक्यात ठेवण्यासाठी होऊ शकेल.
आणखी वाचा
First published on: 21-10-2013 at 11:19 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coconut oil could combat tooth decay study