सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं, दात घासणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो. पण काहीजण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाची गुळणी धरतात. हा कुठला उपाय म्हणत अशा उपायाची खिल्ली उडवणारेही खूप आहेत. तेलाची गुळणी करणं हा प्राचीन उपाय आहे. यालाच माॅर्डन सवयीच्या भाषेत ऑइल पुलिंग असंही म्हणतात.तुम्ही इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना ते पाहिले असेल किंवा सेलिब्रिटींनी पॉडकास्टवर त्याचा उल्लेख करताना ऐकले असेल.

ऑइल पुलिंग म्हणजे काय? ते कसे काम करते?

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, “ही तेलाची गुळणी आणि नंतर ते थुंकण्याची पद्धत आहे.” या जुन्या पद्धतीमध्यो तोंडाची स्वच्छता करण्यासाठी नारळाचे तेल, सूर्यफूल तेल किंवा तीळाचे तेल वापरणे समाविष्ट असते. तुम्हाला तेलाच्या “५ ते २० मिनिटे गुळण्या कराव्या लागतील. इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ सायन्सेसमधील २०१७ च्या अभ्यासात असेही म्हटले आहे की ग्रामीण भागात ऑइल पुलिंग पूर्वीपासून केले जाते.

ऑइल पुलिंग ४ आरोग्य फायदे –

योग आणि आयुर्वेद तज्ज्ञ अनुष्का परवानी यांनी अलीकडेच ऑइल पुलिंग करण्याचे फायदे सांगितले आहेत.

१. तोंडाला डिटॉक्सिफाय करते: जेव्हा तुम्ही तेलाची गुळणी तेव्हा ते जंतू आणि विषारी पदार्थांना अडकवण्यास मदत करते, जे तुम्ही नंतर थुंकता. यामुळे चांगल्या बॅक्टेरियांना वाढण्यासाठी जागा मिळते, जळजळ कमी होते आणि तुमचे तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

२. तोंडाची दुर्गंधी कमी करते: तोंडाची दुर्गंधी येण्याचे कारण बहुतेकदा कोरडे असते. ऑइल पुलिंगने तोंड ओलसर राहते.

३. हिरड्या आणि दात मजबूत करते: युरोपियन जर्नल ऑफ डेंटिस्ट्रीमधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ऑइल पुलिंग केल्याने हिरड्यांना आलेली सूज कमी होते. ते बॅक्टेरिया आणि जळजळ शांत करण्यास मदत करते आणि तेल तोंडातील आम्लतेची पातळी देखील कमी करते, ज्यामुळे तुमचे इनॅमल सुरक्षित राहते.

४. पचन सुधारते: काही तेलांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या पचनाला मदत होते. शिवाय, ते तुमच्या शरीरात जाण्यापूर्वीच विषारी पदार्थ बाहेर टाकते.

ऑइल पुलिंग करण्याची योग्य पद्धत काय आहे?

  • दात घासणे.
  • तुमची जीभ स्वच्छ करा.
  • कोल्ड-प्रेस्ड नारळ तेलाची बाटली घ्या.
  • १ टेबलस्पून तोंडात घाला.
  • तुमचे डोके वर करा किंवा तेल एका बाजूने दुसरीकडे हलवा. दररोज सकाळी १०-१५ मिनिटे हे करा.