Coconut Water Benefits: प्रत्येकाला नेहमीच चिरुतरुण आणि आकर्षक दिसायचे असते. यासाठी अनेक जण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जिममध्ये तासनतास वर्कआऊट करतात. यात वर्कआउटनंतर काही जण स्पोर्टस् ड्रिंक्स पिणेही पसंत करतात. व्यायामानंतर शरीरास जाणवणारा थकवा दूर करण्यासाठी हे स्पोर्ट्स ड्रिंक प्यायले जाते. पण, रोज महागडे स्पोर्ट्स ड्रिंक पिणे प्रत्येकालाच परवडणारे नसते. अशावेळी महागड्या स्पोर्टस् ड्रिंक्सला पर्याय शोधला जातो. पण, इंटरनेटवर स्पोर्टस् ड्रिंक्सला भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने काय प्यावे समजत नाही. अशा परिस्थितीत ५४ व्या वर्षी चिरतरुण दिसणारी ‘मैंने प्यार किया’फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिने व्यायामानंतर महाग प्रोटीन पावडरला एक सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय सुचवला आहे. हा पर्याय म्हणजे नारळ पाणी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्कआउटनंतर स्पोर्ट्स ड्रिंक्सऐवजी नारळ पाणी पिण्याचे काय आहेत फायदे?

वर्कआउटनंतर नारळ पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे सर्व ऋतूमध्ये पिऊ शकतो असे आदर्श पेय आहे. नारळाचे पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते; त्यामुळे शरीरातील थकवा दूर करण्यास मदत होते. यात कॅलरीज आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण फार कमी असते. तसेच ते पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्समध्ये समृद्ध आहे, जे शरीरातून गमावलेली पोषक तत्वे पुन्हा भरण्यास मदत करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, नारळ पाणी वर्कआउटनंतरचे एक आदर्श पेय म्हणून का ओळखले जाते.

वर्कआउटनंतर नारळ पाणी पिणे का फायदेशीर? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन म्हणाली…

दरम्यान, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिने व्यायाम केल्यानंतर नारळाचे पाणी हे साखर असलेल्या स्पोर्ट्स ड्रिंक्सपेक्षा चांगले का आहे हे सांगितले. ती म्हणाली की, नारळाचे पाणी जास्त हायड्रेटिंग आहे आणि वर्कआउटनंतर स्पोर्ट्स ड्रिंक्सचा उत्तम पर्याय आहे. फॅन्सी आणि महागड्या सगळ्याच गोष्टी चांगल्या नसतात.

भाग्यश्री पुढे म्हणाली की, कोणीही हे साधे पेय पिऊ शकतो आणि कॅलरीदेखील कमी करू शकतो. हे तुमचे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण वाढवते आणि थकवा, अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमच्या शरीराला व्यायामानंतर आवश्यक असलेले पोषक तत्व देते.

न्यू इअर पार्टीत मद्यपानाचा भुर्दंड बसणार? हॉलिडे हार्ट सिंड्रोम टाळण्यासाठी काय कराल? वाचा डॉक्टरांचा सल्ला

आहारतज्ज्ञांनी दिली नारळ पाण्यातील पौष्टिक घटकांची माहिती

याच पार्श्वभूमीवर बंंळुरूमधील जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना वर्कआउटनंतर नारळ पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांच्या मते, वर्कआऊटदरम्यान घामाच्या स्वरूपात शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते. तसेच इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाणही घटते. दरम्यान, स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये पाण्याचा समावेश असला तरी त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट पातळी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. अशावेळी जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट करणे अधिक कठीण होऊ शकते. पण, व्यायामापूर्वी नारळाचे पाणी पिल्याने निर्जलीकरण होण्याचा धोका कमी होतो. नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्ससह नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आढळतात, जे शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात. जर तुम्हाला शरीरात अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर हे तुमच्यासाठी योग्य एनर्जी ड्रिंक असू शकते. याशिवाय स्नायूंना मजबूत करण्यासही मदत करते.

‘या’ लोकांनी नारळ पाणी पिताना घ्यावी काळजी

नारळाचे पाणी सामान्यतः सर्वांसाठी सुरक्षित मानले जाते. तज्ज्ञांनी नमूद केल्यानुसार, काही लोकांना नारळाची ॲलर्जी असू शकते किंवा नारळाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्यांना ॲलर्जी होऊ शकते. दरम्यान, नारळाच्या पाण्यात नैसर्गिक शर्करा आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे मधुमेह असलेले लोक किंवा जे लोक त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत तपासतात, त्यांनी नारळाचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांच्या मते, तुम्हाला मूत्रपिंडाचा त्रास असल्यास, नारळ पाणी पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. उच्च रक्तदाब असलेल्यांना नारळ पाण्यातील हाय सोडियममुळे त्याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे दबाव आणखी वाढू शकतो.