: No Waste Fruit Coconut : बहुतेक लोकांना नारळ आवडतो. कारण- हे एक अतिशय अष्टपैलू फळ आहे, जे तुम्हाला स्वादिष्ट अन्न आणि DIY स्किनकेअर / केसांची काळजी घेण्यास मदत करते. ते स्वयंपाकघरात वापरण्याबरोबर सौंदर्य दिनचर्या ठरविण्यासाठी अत्यंत सुलभ घटक ठरते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष किंवा No-Waste Fruit, असेही म्हणतात. कारण- झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग होतो.
नारळाचे फायदे
डिजिटल निर्मात्या डॉ. शिल्पा अरोरा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली, “बहुमुखी वापरामुळे नारळ हे खरे वरदान आहे. नारळाच्या मलईमधून शक्तिशाली लॉरिक अॅसिड मिळते, जे मेंदूच्या कार्याला चालना देते. निरोगी केसांसाठी तेल असो किंवा सर्वोत्तम नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट नारळाचे पाणी असो, त्यात बरेच काही आहे.”
याबाबत ‘सात्त्विक मूव्हमेंट’च्या सह-संस्थापक सुभा सराफ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “नारळाचे वापर करण्याचे विविध मार्ग आहेत.”
सराफ यांनी सांगितले नारळाच्या आतील मऊ मांस, ज्याला आपण मलई म्हणतो, “ते मांस खूप समृद्ध , स्वादिष्ट व मलईदार आहे. हा आरोग्यदायी नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा ते तुमच्या मिल्कशेक किंवा मिष्टान्नांमध्ये वापरता येते. नारळाचे पाणी हे नैसर्गिक आणि ताजेतवाने करणारे पेय आहे, जे समृद्ध जीवनदायी पोषक घटकांनी समृद्ध आहे.”
त्यांनी सांगितले, “बाहेरील कठीण कवचाचा तुम्ही सुंदर वाट्या, भांडी किंवा इतर सजावटीच्या वस्तू यांसाठी वापर करू शकता. प्रत्यक्षात बहुतेक वेळा फेकला जाणारा नारळाच्या शेंड्याचा भुसादेखील उपयुक्ततेच्या दृष्टीने अष्टपैलू असतो आणि बहुतेकदा नारळ्याच्या शेंड्याचा दोरखंड, पायपुसणे, ब्रश, तसेच झोपण्याच्या गादीमध्ये पॅडिंग करण्यासाठी वापर केला जातो.
नारळाचा भुशाचा वापर घरटे बनविण्यासाठी, घरांसाठी छत तयार करण्यासाठी किंवा फक्त पॅडिंग किंवा विविध पोकळ वस्तूंसाठी स्टफिंग म्हणून वापर केला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.