हार्वर्डमधील भारतीय संशोधकाचा दावा
दैनंदिन जीवनात दररोज दोन ते तीन वेळा कॉफीच्या सेवनामुळे हृदयरोग, मधुमेह आणि नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्यांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा दावा भारतीय मूळ असलेल्या संशोधकांनी केला आहे.
आधुनिक जीवनशैलीत पाचपेक्षा कमी वेळा कॉफीचे सेवन करणाऱ्यांना हृदयरोग, मंज्जातंतूशी निगडित आजार म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचा मधुमेह आणि आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे.
यासाठी केवळ कॉफीतील कमी-अधिक प्रमाणात असलेले उत्तेजक द्रव्यच फक्त कारणीभूत नसून कॉफीच्या बियांमध्ये असलेली रासायनिक संयुगे देखील शरीराला पोषक असल्याचे संशोधनात म्हटले आहे. अभ्यासक आणि बोस्टनमधील मॅसेकुसेट येथील हार्वर्ड थॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये डॉक्टरेटचे विद्यार्थी मिंग डिंग यांनी कॉफीमधील विशिष्ट पदार्थ शरीरातील मधुमेहावर रामबाण उपाय असून शरीरातील संवेदनांना देखील नियंत्रणात ठेवत असल्याचे संशोधनात म्हटले आहे. कॉफीच्या सेवनाने जैविक प्रक्रियेवर होणाऱ्या बदलांबाबत संशोधनाची गरज व्यक्त करताना कॉफीमधील हाच गुणधर्म मृत्यूदर कमी करण्यासाठीचा मुख्य दुवा ठरत असल्याचे मत डिंग यांनी मांडले.
संशोधनातील तीन वेगवेगळ्या पद्धतीमधून संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ७४ हजार ८९० आणि ९३ हजार ०५४ परिचारिकांचे तर तिसऱ्या टप्प्यात आरोग्य क्षेत्राशी निगडित ४० हजार ५५७ पुरुषांचे परीक्षण केले गेले.
हा निष्कर्ष गेल्या चार वर्षांपासून कॉफी सोबत विविध पदार्थाचे सेवन आणि वयोमान ३० पेक्षा जास्त असणाऱ्या वर केलेल्या संशोधनावर आधारित असून कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करणाऱ्यांमध्ये धूम्रपान आणि मद्य प्राशन करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कॉफी आणि धूम्रपान यांच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूची तफावत पाहता धूम्रपान न करणाऱ्या आणि कॉफीचे सेवन करणाऱ्यांच्या मृत्यूचा दर कमी असल्याचे समोर आले आहे.
हॉर्वर्डचे आहार आणि रोग परिस्थिती विज्ञानाचे प्रोफेसर फ्रंक ह्य़ू यांच्या मते सुदृढ शरीरासाठी दररोज कॉफीचे सेवन पोषक असून गर्भवती माता आणि लहान मुलांमधील कॉफीचे अतिरिक्त सेवन घातक आहे.
हॉर्वर्डच्या संशोधक आंबिका सतीजा आणि शिल्पा एन. भूपतीराजू यांच्या संशोधनात कॉफीचे सेवन केल्यामुळे आणि न केल्यामुळे मृत्यू दरात तफावत झाल्याचे ठामपणे सांगणयात आले नाही, तर यापूर्वीच्या संशोधनात देखील कॉफीचे सेवन केल्यामुळे आणि विशिष्ट आजारांमुळे झालेल्या मृत्यूदरात कोणतेही साधम्र्य आढळलेले नाही. त्यामुळे या विषयाच्या सखोल संशोधनानंतरच अंतिम निष्कर्ष काढता येईल. तोपर्यंत फक्त कॉफीचे सेवन शरीराला पोषक असल्याची माहिती नवीन संशोधनातून समाविष्ट करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा